एलॉन मस्क यांची ‘(Tesla)’ कंपनी लवकरच मोठय़ा प्रमाणात कर्मचारी कपात करणार आहे. ‘टेस्ला’ मध्ये 10 टक्के कर्मचाऱयांना म्हणजे सुमारे 14 हजार कर्मचाऱयांच्या कामावरून काढून टाकणार आहे. एलॉन मस्क यांनी कर्मचाऱयांना नोकरकपातीचे ई-मेल केले आहेत. ई-मेलमध्ये एलॉन मस्क यांनी म्हटलंय की, पंपनीला विकासाच्या पुढील टप्प्यासाठी तयार करत असताना, खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी पंपनीच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही जागतिक स्तरावर आमची संख्या 10 टक्केपेक्षा कमी करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.
एलॉन मस्क हिंदुस्थानात येणार
एलॉन मस्क लवकरच हिंदुस्थान (Tesla)दौऱयावर येणार असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावेळी एलॉन मस्क गुंतवणुकीची योजना जाहीर करू शकतात.
‘एक्स’वर रिप्लायसाठी पैसे मोजावे लागणार
एक्सवर पोस्ट लाईक आणि रिप्लाय करण्यासाठी नवीन युजर्सना आता शुल्क भरावे लागतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी एका पोस्टला उत्तर देताना शुल्क आकारण्याबाबतचे संकेत दिले. मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हलेय, ‘बॉट्सचा सतत हल्ला थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नवीन वापरकर्त्यांना पोस्ट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील आणि ती रक्कम नाममात्र असेल. मात्र, किती पैसे द्यावे लागणार हे अद्याप स्पष्टपणे सांगितले नाही. पैसे द्यावे लागल्यानंतर बॉट्स आणि बनावट खात्यांवरील पोस्ट कमी होतील, असा मस्क यांना विश्वास आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून अनेक धाडसी निर्णय घेतले. सुरुवातीला त्यांनी जुन्या कर्मचाऱयांना कमी केले त्यानंतर ‘ट्विटर’चे नाव बदलून ‘एक्स’ केले. एवढेच नव्हे तर खात्यावरील ‘ब्लू टिक’साठी देखील सबस्क्रीप्शन ठेवले.
हेही वाचा :
कोल्हापुरात महायुतीचा मास्टरप्लॅन, तटबंदी केली भक्कम
विशाल पाटलांच्या बंडखोरीनं ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली, संजयकाकांना फायदा होणार?
Microsoft युजर्स आहेत हॅकर्सच्या निशान्यावर, सरकारी एजन्सीने दिला धोक्याचा इशारा