आई आपल्या लेकरासाठी खूप काबाडकष्ट करत असते, पण तिच आई मुलाच्या जीवावर(head) उठली तर काय? अशाच एका क्रूर आईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका आईने आपल्याच मुलाला बेदम मारल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला तिच्याच पोटच्या गोळ्याला बेदम मारहाण करताना आणि त्याचा गळा दाबताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये महिला(head) तिच्या मुलाच्या अंगावर बसल्याचं दिसत आहे. यानंतर ती चिमुकल्यावर एकामागोमाग एक मुक्क्यांचा वर्षाव करते, त्याचे केस पकडून जोरजोरात डोकं जमिनीवर आदळते, त्याला चावते, यानंतरही तिचं मन भरत नाही तर ती त्याचा गळा दाबते. इतकंच काय तर या महिलेने दुसऱ्या मुलाकडून हा सर्व प्रकार मोबाईल फोनमध्ये चित्रित करुन घेतला. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल.
एका क्रूर आईचा मुलाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये महिला मुलाच्या छातीवर बसलेली दिसत आहे आणि त्याला सतत बेदम मारहाण करत आहे, त्याचं डोकं जमिनीवर आपटते आणि त्याचा गळा दाबते. मुलं स्वतःला वाचवण्यासाठी रडत आईकडे विनवणी करत आहे. आईकडे जीवाची भीक मागत आहे, पण हैवान बनलेल्या आईला मुलाची जराही कीव येत नाही. मुलगा आईकडे पाणी मागत आहे, पण आई त्याला जबर मारहाण करत आहे. व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ हरिद्वार परिसरातील झाब्रेडा येथील असून दोन महिन्यांपूर्वीचा असल्याचं समोर आलं आहे.
व्हायरल व्हिडीओची सत्यता जाणून घेण्यासाठी उत्तराखंड पोलीस जेव्हा महिलेकडे पोहोचले तेव्हा सत्य समजल्यानंतर अधिकारीही चक्रावून गेले. व्हायरल व्हिडीओबद्दल महिलेने पोलिसांना सांगितलं की, गेल्या 10 वर्षांपासून तिचा पतीसोबत वाद सुरू असून पती घरी राहत नाही आणि पैसेही पाठवत नाही. बरेच दिवस तो घरी आला नाही. एका दुकानात काम करून महिला घरखर्च भागवते.
पतीला घाबरवण्यासाठी आणि घरातील जबाबदाऱ्यांकडे त्याचं लक्ष वेधण्यासाठी तिने आपल्या मोठ्या मुलाला मारतानाचा हा व्हिडीओ बनवला होता आणि 2 महिन्यांपूर्वी पतीला पाठवला होता, त्यानंतर तिच्या पतीने तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. महिलेनं सांगितलं की, मारहाणीदरम्यान तिने मुलाच्या छातीवर डोके ठेवण्याचे नाटक केले होतं, पण मुलाला चावा किंवा दुखापत केली नाही, असं महिलेचं म्हणणं आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
हेही वाचा :
मगरीसोबतची मस्ती पडली महागात, जबडा उघडला आणि क्षणार्धात… Video Viral
तुम्हाला बाळ होईल तेव्हा मी…, लग्नाचा उल्लेख करत सलमानचं वक्तव्य
सरकारची ‘लाडका मित्र’ योजना; मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव; ठाकरेंचा घणाघात