कोल्हापुरला वाचवण्यासाठी सतेज पाटलांनी गाठले कर्नाटक

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, आणि महापुराची(Kolhapur) धास्ती पुन्हा एकदा वाढली आहे. 2019 आणि 2021 मध्ये करवीर आणि शिरोळ तालुक्याला महापुराचा फटका बसला होता. यंदा कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे महापुराचा धोका उद्भवू नये म्हणून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आहे.

पंचगंगा (Kolhapur)नदी सध्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि चिखली गावांना पुराचा सर्वाधिक धोका आहे. शहरातही काही भागात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन सज्ज असले तरी कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे महापुराचा धोका कायम आहे.

आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच, मंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडेही धरणातील विसर्ग वाढवून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आणि डी.के. शिवकुमार यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डी.के. शिवकुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराच्या संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर : ‘पंचगंगे’ने धोक्याची पातळी ओलांडली, ८३ बंधारे, १० राज्यमार्ग पाण्याखाली

‘…तर वर्षातले 300 दिवस क्रिकेट तुला रडवेल’; शमीला पाकिस्तानी क्रिकेटरचा ‘श्राप’

अर्थमंत्र्यांची एक घोषणा, अन् रतन टाटांची कंपनी मालामाल; गुंतवणूकदारांचीही चांदी!