वैदिक ज्योतिष (zodiac)शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यानुसार, लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. या नवीन वर्षात प्रत्येकजण आपल्यासाठी, कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. ज्या काही समस्या सुरु आहेत त्या लवकर संपाव्यात आणि नवीन वर्षाबरोबर सर्व काही सुरळीत व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनी देव 2025 मध्ये फक्त 3 राशींवर आपली कृपादृष्टी बरसणार आहे. त्यांना आशीर्वाद देणार आहे. त्यामुळे या राशींचं जीन अगदी सुरळीत होईल तर, या लकी (zodiac)राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
शनी संक्रमण 2025
शनी सध्या आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. 2025 मध्ये शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे या राशीचे लोक अडीच वर्ष बृहस्पतीच्याच राशीत असाणार आहेत. शनी 29 मार्च रोजी कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करणार आहे.
कर्क रास
मीन राशीत शनीचं संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक असणार आहे. कर्क राशीच्या लोकांवर सध्या शनीची ढैय्याय सुरु आहे. त्यामुळे मीन राशी संक्रमण करताच कर्क राशीवर असणारा ढैय्याचा प्रभाव संपुष्टात येईल. त्यामुळे कर्क राशीसाठी नवीन वर्ष खास असणार आहे.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात फार लाभदायक असणार आहे. कारण या राशीच्या लोकांना ढैय्या आणि साडेसातीपासून मुक्ती मिळेल. ढैय्याचा प्रभाव कमी झाल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांवर असलेले सर्व संकट दूर होतील.
मकर रास
मकर राशीच्या लोकांवर सध्या शनीची साडेसाती सुरु आहे. मात्र, 29 मार्च रोजी शनीने मीन राशीत प्रवेश करताच या राशीवर असलेली शनीची साडेसाती संपेल. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
पत्नीची हत्या, नंतर पतीने Google वर सर्च केलं, “बायकोच्या मृत्यूनंतर किती दिवसात पुन्हा लग्न करता येईल?”
उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही? एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले….
‘पुष्पा 2’ मधील खलनायक फहाद फासिलचा ‘या’ अभिनेत्रीसह रोमान्स!