बॉलिवूड अभिनेत्री (Entertainment news)उर्वशी रौतेला ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या तिचं चर्चेत येण्याचं कारण हे सनी देओल आणि रणदीप हुड्डाच्या जाट या चित्रपटातील एक डान्स नंबर आहे. ‘सॉरी बोल’ या नावाच्या गाण्यानं प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया मिळाली आहे. आता सॉरी बोल’ या नावाच्या गाण्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाली आहे. आता डिलीट झालेल्या या पोस्टमध्ये झालेल्या या गाण्याची तुलना तमन्ना भाटियाच्या ‘रेड 2’ च्या ‘नशा’ या गाण्यानं झाली आहे.

सोमवारी उर्वशीनं(Entertainment news) त्याच्या इन्स्टाग्रामवर एका कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्यात एका प्रेक्षकानं जाटमधील तिचं गाणं ‘सॉरी बोल’ ची तुलना ‘रेड 2’ मध्ये तमन्नाच्या ‘नशा’ शी करण्यात आली. या कमेंटमध्ये म्हटलं होतं की ‘हे गाणं ‘नशा’ पेक्षा चांगलं आहे.’ तमन्नाचं हे गाण त्या काळात चांगलंच गाजलं होतं. खरंतर, यानंतर तिनं लगेच तिची पोस्ट डिलीट केली. पण एका रेडिट वापरकरत्यानं त्याचा स्क्रीनशॉट घेतला होता आणि तो त्यानं शेअर केला होता.
उर्वशी रौतेलाला ट्रोल करत हा नेटकरी म्हणाला, ‘ती असं करणार नाही? असा विचार करणं देखील चुकीचं आहे. जगातील सगळ्यात कमी वयाची, सगळ्यात सुंदर महिला असल्यानं, तिच्या काही जबाबदाऱ्या आहेत. प्रत्येकवेळी जेव्हा तिचं काही नवीन काम किंवा प्रोजेक्ट रिलीज होतो, तेव्हा कायम ती स्वत: ची स्तुती करताना दिसते आणि त्यातही ती पहिली असते जी स्वत: ची स्तुती करते. एका दुसऱ्या व्यक्तीनं म्हटलं की ही तिला मिळालेली पहिली संधी नाही, तुम्ही सगळे विसरताय की जेव्हा ‘गेम चेंजर’ फ्लॉप झाला होता तेव्हा तिनं कियाराचा उल्लेख केला होता.’

‘जाट’मध्ये उर्वशी रौतेलाचा रणदीप हुड्डासोबत एक स्पेशल डान्स नंबर आहे. चित्रपटात सनी देओल, रिजीना कैसांड्रा आणि विनीत सिंह देखील प्रमुख भूमिकेत आहे. गोपीचंद मालिनेनीनं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अॅक्शन ड्रामा पाहायला मिळाला आहे. या चित्रपटानं पाच दिवसात 47.75 कोटींची कमाई केली आहे.
हेही वाचा :
नृसिंहवाडीत देवदर्शन करून नदीत उतरला अन्…
शेतकऱ्यांना मोफत वीज विश्वास कैसा ठेवायचा?
शरद पवारांना जबरदस्त धक्का; पक्षातील बडा नेता भाजपात पक्षप्रवेश करणार