SBI ने ग्राहकांना दिलं दिवाळी गिफ्ट! लोन झालं स्वस्त

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने(SBI) सणासुदीच्या काळात म्हणजेच दिवाळीपूर्वीचकरोडो खातेदारांना दिवाळी गिफ्ट दिल आहे. SBI ने फंड-आधारित कर्ज दर कमी करून सामान्य ग्राहकांना स्वस्त कर्जाची भेट दिली आहे. त्यामुळे आता SBI च्या ग्राहकांना एकप्रकारे दिलासाच मिळाला आहे.

SBI ने एका(SBI) महिन्याच्या कर्जासाठी दिलेल्या कर्जावरील MCLR 0.25 टक्के किंवा 25 बेस पॉईंटने कमी केला आहे. तसेच MCLR च्या आधारावर बँका त्यांच्या ग्राहकांसाठी गृह कर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज यांसारख्या कर्जांचे व्याजदर ठरवतात.

याशिवाय या नवीन कर्ज दरांचे मूळ दर हे 15 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत आणि एका महिन्याच्या MCLR व्यतिरिक्त इतर दर तेच आहेत आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही. तर आता आपण SBI चे MCLR आधारित कर्ज दर जाणून घेऊयात…

कोणत्या कर्जावर MCLR किती आहे? :
– ओव्हरनाइट लोनचा MCLR 8.20 टक्के आहे.
– एका महिन्याचा MCLR 0.25 टक्क्यांनी 8.45 टक्क्यांवरून 8.20 टक्क्यांवर आला आहे.
– तीन महिन्यांचा MCLR 8.50 टक्क्यांवर कायम आहे.
– सहा महिन्यांचा MCLR 8.85 टक्के इतकाच आहे.
– एक वर्षाचा MCLR 8.95 टक्क्यांवर कायम आहे.
– दोन वर्षांचा MCLR 9.05 टक्के इतकाच आहे.
– तीन वर्षांचा MCLR 9.10 टक्क्यांवर कायम आहे.

MCLR म्हणजे काय?
बँकेने देऊ केलेला सर्वात कमी कर्ज दर हा निधी-आधारित कर्ज दर (MCLR) म्हणून ओळखला जातो. याशिवाय एसबीआयने अद्याप एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) दर कमी केलेले नाहीत, परंतु या बदलाद्वारे भविष्यात एफडीच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

‘प्रेमाने समजले नाही तर धडा शिकवू’, नेहा कक्कर आणि तिच्या नवऱ्याला धमकी

‘या’ जगप्रसिद्ध गायकाचा दुर्दैवी अंत, तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

जरांगे पाटलांनी निवडणूक लढवण्याचे संकेत देताच तब्बल 800 इच्छुकांचे आले अर्ज