स्कूल बस उलटल्याने भीषण अपघात, पाच मुलांचा मृत्यू, तर १५ जण जखमी

हरियाणातील महेंद्रगडमधील कनिना येथील उनहनी गावाजवळ शाळेची बस(bus transportation) उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच मुलांचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत.

जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हरटेक करण्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. गंभीर जखमी मुलांना रेवाडी येथे रेफर करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस(bus transportation) चालक दारूच्या नशेत होता. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय उपचारासाठी महेंद्रगड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले आहे.

हेही वाचा :

क्रिकेटच्या महाकुंभाचा बिगुल वाजला; ‘या’ आठ ठिकाणी रंगणार वर्ल्ड कपचा थरार

पुढील 24 तासांत राज्याच्या ‘या’ भागातील हवामान बिघडणार

मंडलिकांच्या एका सवयीवर अंबरीश घाटगेंची 10 हजारांची पैज