आजच्या महाराष्ट्र दिनी या राज्याचे(state) सर्वक्षेत्रीय वैभव पुन्हा मिळविण्याचा संकल्प सर्वांनी सोडायला हवा.
महाराष्ट्राचा(state) ‘मंगल कलश’ चौसष्ट वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आणला. तिथून पुढे सुरू झालेले मराठी माणसाचे राज्य आज वेगळ्याच स्थित्यंतरासाठी सज्ज होत आहे. वास्तविक हा मंगल दिन. एकदिलाने आणि एकमुखाने मऱ्हाटी राज्याचा सण साजरा करण्याचा दिवस.
परंतु, यंदा तो ऐन निवडणुकीच्या धामधुमीतच आल्याने चित्र वेगळेच दिसते आहे. ते आहे हमरीतुमरीचे. बिघडलेल्या राजकीय बोलांचे. ढळलेल्या तोलाचे. एकमेकांतच संघर्ष करण्यात धन्यता मानणाऱ्यांसाठी तर तो ‘मंगल कलश’ आणला नव्हता.
मग केवळ राजकीय विरोधासाठी एवढी टोकाची भाषा कशासाठी? अशा स्थितीत दोन-चार गोड गोड शब्द बोलून वेळ मारून न्यावी, की परखड आत्मचिंतनाचा मार्ग स्वीकारावा? या संभ्रमात कुठलाही सुजाण मराठी माणूस सापडलेला असेल.
महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हाचे चित्र लोभस होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी जोरदार झगडा महाराष्ट्रात सुरू होता आणि त्याचवेळी महागुजरातसाठी तिथल्या प्रांतातही निदर्शने, आंदोलने झडत होती.
एकाच दिवशी जन्मलेली ही दोन राज्ये. एक राज्य ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी दुमदुमत होते, आणि दुसरे ‘गर्वी गुजरात’चा उद्घोष करत होते. मुंबई कोणाची? हा ज्वलंत सवाल तेव्हाही धगधगत होता.
राज्य-स्थापनेनंतर अवघ्या तीनेक महिन्यातच बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मार्मिक’ची स्थापना केली. विशेष म्हणजे त्याचे प्रकाशन यशवंतरावांच्या हस्तेच झाले होते! आता या दोन्ही राज्यांतून ‘बुलेट ट्रेन’ दौडवण्याच्या योजना असल्या तरी सांस्कृतिक झगडा काही अजून थांबलेला नाही.
अर्थात त्यात बव्हंशी राजकीय हेतूच दडलेले आहेत, हा भाग वेगळा. १९६२ मध्ये महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक झाली, तेव्हा बॅ. अंतुले, शंकरराव चव्हाण असे दिग्गज निवडून आले. पुढे हे दोघे मुख्यमंत्री झाले.
हेही वाचा :
हातकणंगले मतदारसंघांत मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर!
प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेसला धक्का; माजी मंत्र्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कोल्हापुरात राजकीय आखाडा तापला; भर सभेत धनंजय महाडिक सतेज पाटील यांच्यावर बरसले