पुणे : महिलेला हरविलेले मांजर(cat) शोधून देण्याचे आश्वासन देऊन मोबाईल नंबर घेतला आणि नंतर महिलेला शारीरीक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेला व्हॉटसअपवर अश्लिल व्हिडिओ व ऑडिओ देखील पाठविला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. याप्रकरणी एका ४९ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अविनाश नावाच्या एकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी रात्री आठ ते रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी मांजर(cat) पाळले होते. परंतु, काही दिवसांपासून मांजर बेपत्ता आहे. हे मांजर हरविले आहे. त्या शोध घेत असतानाही ते मिळालेले नाही. दरम्यान, त्यांच्या येथे राहणार्या अविनाशने त्यांना हरवलेले मांजर शोधून देतो, असे सांगून त्यांचा मोबाईल नंबर घेतला.
नंतर मांजर शोधून दिल्याच्या बदल्यात तुम्ही माझ्या सोबत तसेच माझ्या बॉससोबत शारीरीक संबंध ठेवा, असे बोलून त्यांचा विनयभंग केला. तक्रारदारांच्या व्हॉटसअॅपवर अश्लिल व्हिडिओ व ऑडिओ पाठवला. तर, मी तुमच्यासाठी जीव देऊ शकतो, तसेच जीव घेऊ शकतो, असे बोलून धमकी दिली. पोलीस निरीक्षक पुरी अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा:
घटक पक्षांच्या गोटात भीती, यालाच म्हणतात शरद नीती
मोठी बातमी! आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?, मतदारसंघही ठरला?
मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली का? बच्चू कडू उत्तर देताना म्हणाले, ‘4 नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार’