विधानसभेपूर्वी महायुतीत स्फोट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दूर करण्याची सेना-भाजप नेत्यांची मागणी?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना(political news) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीच्या माध्यामातून एकत्र लढवली होती. यामध्ये महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत महायुतीचा धुव्वा उडवला. यानंतर महायुतीमध्ये अंतर्गत वाद उफाळत असून, अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये नको अशी मागणी सेना-भाजप नेते करत असल्याची माहिती सूत्रांनी दिल्याची बातमी साम टीव्हीवर प्रसिद्ध झाली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये ठेवण्याच्या(political news) बाबतीत पुनर्विचार करावा अशी मागणी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे दिली आहे. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाची मते भाजप उमेदवारांना मिळाली नसल्याचा आरोप हे नेते करत आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत जिथे अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत, तिथे सेना-भाजपचे उमेदवार पिछाडीवर राहिल्याचे हे नेते म्हणत आहेत. त्यामुळे आता महायुतीत तिसऱ्या पक्षाची गरज काय असे हे नेते म्हणत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या पक्षावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, “माढा, सोलापूर आणि दिंडोरीमध्ये आमच्या आमदारांनी काम केले आहे.”

या सर्व घडामोडीत अजित पवार यांच्या पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पक्षात नाराज असून, ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जर भुजबळ यांनी पक्ष सोडला तर राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का बसू शकतो.

लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या. त्यांनी 13 जागी विजय मिळवला. यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी 9 जागा जिंकल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अवघ्या 10 जागा लढवत 8 जगांवर विजय मिळवला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागांवर यश मिळाले.

हेही वाचा :

व्हायरल अटॅकनंतर गायिका अलका याज्ञिकना ऐकूच येईना

प्रेमाचा भयानक शेवट, प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीला संपवलं; थरारक घटनेचा VIDEO

मोठी बातमी! विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा, 12 जुलैला मतदान!