काँग्रेसचे (congress)माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, माजी खासदार प्रतापराव बाबुराव भोसले तथा भाऊ (वय 90) यांचे आज सकाळी भुईंज (ता. वाई) येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या शेतात शोकापुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह हजारो चाहत्यांनी जड अंतःकरणाने आपल्या भाऊंना अखेरचा निरोप दिला.
प्रतापराव भोसले यांना वयोमानाप्रमाणे गेल्या काही दिवसांत प्रपृतीच्या पुरबुरी सुरू होत्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यात झालेल्या सातारा लोकसभेच्या निवडणुकीत 85 वर्षांपुढील ज्येष्ठांसाठी निवडणूक आयोगाने घरातून मतदानाच्या केलेल्या व्यवस्थेतून त्यांनी घरीच मतदानाचा हक्क बजावला होता. मध्यंतरी त्यांना उपचारार्थ पुण्याला हलवले होते. तिथून चार-पाच दिवसांपूर्वी त्यांना भुईंजला घरी आणले होते. आज सकाळी सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रतापराव भोसले यांच्या पश्चात तीन पुत्र माजी आमदार मदन भोसले, मोहनराव भोसले, गजानन भोसले, विवाहित कन्या पद्मादेवी पाटील, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.(congress)
भाऊंच्या निधनाचे वृत्त वाऱयासारखे सर्वत्र पसरले आणि वाई तालुक्यासह जिह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, नेतेमंडळींची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले यांनी अंत्यदर्शन घेऊन पुटुंबीयांचे सांत्वन केले.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, देशभक्त किसन वीर यांच्या सहवासात प्रतापराव भाऊ यांची राजकीय कारकीर्द बहरली. 1967 पासून 1985 पर्यंत सलग चार वेळा ते वाई-खंडाळा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. या काळात राज्यमंत्री, पॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी उत्पृष्ट कामकाज केले. 1984 मध्ये यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याने त्यांच्या सातारच्या जागेवरून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. 1984, 1989 व 1991 अशा तीन लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या. या काळात विविध राष्ट्रीय समित्यांवर देखील त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. नंतर राज्यातील युती शासनाच्या काळात 1997 पासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. त्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसला सत्तेवर आणण्यात त्यांचे परिश्रम मोलाचे होते. अत्यंत सुसंस्पृत, चारित्र्यसंपन्न, विचारांची पक्की बैठक असणारे आणि स्वाभिमान जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती.
शोकापुल वातावरणात अंत्यसंस्कार
भुईंजजवळच देगाव रस्त्यावरील शेतात शोकापुल वातावरणात शासकीय इतमामात प्रतापरावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. थोरले चिरंजीव माजी आमदार मदन भोसले यांनी त्यांच्या चितेला मंत्राग्नी दिला. खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, जयपुमार गोरे, प्रमोद शिंदे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी अंत्ययात्रेला उपस्थित होते.
हेही वाचा :
गौतमी पाटीलच्या नवीन VIDEO तील अदांनी चाहत्यांना लावलं वेड
लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहीण आणि भाची अपघाती मृत्यू
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड EX पत्नी बेस्ट फ्रेंड्स! एकमेकांना ‘या’ नावानं मारतात हाक