31 वर्षे काँग्रेसची सेवा केली, पण आता…; बड्या नेत्याकडून खदखद व्यक्त

मागच्या काही दिवसात अनेक नेत्यांनी काँग्रेसला(great leader) सोडचिठ्ठी दिली. राजू वाघमारे यांचंही नाव आहे. राजू वाघमारे यांनी काही दिवसांआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मात्र काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राजू वाघमारे यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केलेत. 31 वर्षे काँग्रेसची सेवा केली, केसेस घेतल्या अंगावर, पण आता नंतर काँग्रेस पक्षात जातीयवाद वाढल्याचा गंभीर आरोप राजू वाघमारे यांनी केला आहे. ते अहमदनगरच्या शिर्डीत माध्यमांशी बोलत होते.

काँग्रेसची 31 वर्ष मी तन मन धनाने(great leader) सेवा केली. केसेस घेतल्या अंगावर घेतल्या. विरोधकांची प्रकरणं बाहेर काढली. माध्यमात भांडत राहिलो. आमच्या मागे ईडी, सीबीआय नाही. आम्ही का पक्ष सोडतोय ? काँग्रेस पक्षातील काही नेते जे महत्वाच्या पदावर आहेत. ते आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात. कोंडी करण्याचा प्रयत्न करतात. त्याचा बळी मी पडलेलो आहे. माझ्यासारख्या अनेकांची काँग्रेस सोडण्याची इच्छा नव्हती. मात्र यांच्या घाणेरड्या राजकारणामुळे यांच्या जातीयवादी राजकारणामुळे काँग्रेस सोडावी लागली, असं राजू वाघमारे म्हणाले.

शिर्डी भागातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे आहेत. मी शिर्डीचे तिकीट मागत होतो. मी एससी सेलचा अध्यक्ष होतो. मी शिर्डीचा भुमिपुत्र असताना, सर्व्हेत माझे नाव पुढे असताना यांनी मला शिर्डीचे तिकीट मागच्या वेळी दिले नाहीत. सर्व्हेत नसलेल्या भाऊसाहेब कांबळे यांना तिकीट दिलं. बौद्ध समाजाची दिड लाख मते असताना समाजाला डावललं गेलं. माझी उमेदवारी नाकारली, असं राजू वाघमारे म्हणालेत.

माझ्या निवडणुकीचा खर्च मी करतो, असं थोरातांना सांगितलं. मतदारसंघातील कामे तुम्ही करा , मी राज्यात आणि देशात काँग्रेस काम करेल असं देखील… असं असताना मला तिकीट का नाकारलं? तर बौद्ध समाजाला उमेदवारी द्यायची नाही. यावेळी तेच उत्कर्षा रुपवतेंसोबत घडलंय. त्यांना का तिकीट दिलं नाही. यावेळची तिकीट आणि ही सिट काँग्रेसने शिवसेनेला विकली. बाळासाहेब थोरातांनी गिफ्ट दिली … इथला मतदार हे काँग्रेससोबत आहेत. तरीही सिट मिळाली नाही, असं राजू वाघमारे म्हणाले.

हेही वाचा :

एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा, मंडलिकांची डोकेदुखी वाढली, एका निर्णयामुळे कोल्हापुरात निवडणुकीचं गणित बदलणार?.

‘मी ठाकरेंचा आनंद दिघे’ म्हणणारे शिंदे गटातून निवडणूक लढणार? नार्वेकरांचे तोंडावर बोट

प्रणिती शिंदेंनी केली भाजपच्या कामाची पोलखोल; ‘मुद्द्याचं बोला ओ’…रॅप सॉंग व्हायरल