शाहरुख खानला तरुणीने दिला इतका जोरदार धक्का, पडता-पडता वाचला! Video

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आज (गुरुवारी) अबुधाबीला आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रवाना झाला आहे. शाहरुख खानला मुंबई विमानतळावर(airport) बघताच चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली. चाहत्यांनी केलेल्या गर्दीमुळे अभिनेता शाहरुख खानला विमानतळावरून फ्लाइटपर्यंत जाण्यासाठी खूप वेळ लागला.

मुंबई विमानतळावर शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. अशातच आज शाहरुख खानला पाहून चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मुंबई विमानतळावर(airport) असणाऱ्या चाहत्यांनी शाहरुख खानला भेटण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी बाचाबाची देखील झाली. मात्र, यावेळी अभिनेता शाहरुख खानचा बॉडीगार्ड, पोलीस आणि विमानतळ सुरक्षा यांनी शाहरुख खानच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली आणि त्याला सुखरूप आत आणले. मात्र, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान विमानतळावर पोहोचण्याची वेळ एका व्हॉट्सॲप ग्रुपवर लीक झाल्याचा दावा केला जात आहे.

शाहरुख खानला विमानतळावर पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती . यावेळी शाहरुख खानने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पँटसोबत मॅचिंग कॅप घातलेली होती. शाहरुख खानचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ Viral Bhayani ने शेअर केला आहे.

शाहरुख खानच्या या व्हिडीओवर चाहते देखील कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने म्हटले आहे की, या परिस्थितीचा विचार करून खासगी विमानानेच जावे. तर काही चाहते वेडेपणाचे वर्णन करत आहेत. अशातच दुसऱ्या चाहत्याने म्हटले आहे की, सुपरस्टारला पाहण्यासाठी लोक काहीही करू शकतात. याला ‘वेडेपणा’ म्हणू नये.

अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो त्याची मुलगी सुहाना खानसोबत दिसणार आहे. या चित्रपटाची चाहते देखील खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. 2023 मध्ये शाहरुख खानचे 3 चित्रपट प्रदर्शित झाले होते. ज्यामध्ये ‘जवान’, ‘पठाण’ आणि ‘डंकी’ या चित्रपटांचा समावेश आहे. यामधील ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले.

हेही वाचा:

लाडक्या बहिणींनो तिसऱ्या हप्त्याचे पैसे ‘या’ दिवशी मिळणार!

संजय राऊतांना दिलासा, कोर्टाकडून जामीन मंजूर, शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती

BCCI च्या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या

‘मागितलं असतं तर सगळं दिलं असतं, पक्ष तोडण्याची गरज नव्हती…’ , सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य