ठाण्यातील शहापूरमध्ये गजबजलेल्या बाजारपेठमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर दोन अज्ञात हल्लेखोराने दुचाकीवर येऊन धडाधड गोळ्या झाडल्या. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू (dead)झाला. त्या अज्ञात व्यक्तीने गोळीबार का केला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गोळीबाराची माहिती समजताच शाहपूरमध्ये एकच खळबळ उडाली. पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
शहापूर तालुक्यातील पंडित नाका येथील बाजारपेठेत असणार्या महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर शनिवारी रात्री गोळीबार झाला. गोळीबारात २५ वर्षीय दिनेशकुमार चौधरी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा आज सकाळी(dead) मृत्यू झालाय.
पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शोध घेत आहेत. आरोपी फरार झाले आहेत, पोलीस त्यांच्या मागावर आहेत. शहापूरमध्ये या घटनेमुळे एकच खळबळ व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवारी रात्री साडे नऊ वाजता महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून गोळीबार केला. या गोळीबारात महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या दिनेशकुमार मोनाराम चौधरी या कामगाराच्या छातीत गोळी लागली. त्याला शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोराने गोळी का झाडली? याचा शोध पोलीस घेत आहे. मारेकरी कोण आहेत याचाही तपास स्थानिक गुन्हा शाखा व शहापूर पोलीस करत आहेत.
हेही वाचा :
2025 मध्ये ‘या’ राशींना होणार बक्कळ लाभ, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
‘फायर है मै’ म्हणणारा ‘पुष्पा’ हमसून हमसून रडला, नव्या आरोपांनंतर अल्लू अर्जुन भावूक,
चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्माबाबत आली वाईट बातमी