बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या प्रकृतीबाबत महत्त्वाचे अपडेट(treatment) समोर आले आहे. काही महिन्यापूर्वी किंग खानला उष्णाघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थामुळे शाहरुखला उपचारासाठी तातडीने अमेरिकेत जावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला डोळ्यांच्या(treatment) संबंधी त्रास जाणवत आहे. मुंबईत शाहरुख खानवर उपचार करण्यात आले. मात्र, काही अडचणी निर्माण झाल्याने आता शाहरुख खानवर अमेरिकेत तातडीने उपचार करण्यात येणार आहे.
‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरुख खान सध्या डोळ्यांवर उपचार घेत आहे. शाहरुख खान उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात गेला. पण ठरल्याप्रमाणे उपचार झाले नाहीत. शाहरुख 29 जून रोजी रुग्णालयात गेला होता, तेथे उपचार व्यवस्थित होऊ शकले नाहीत. त्यामुळे आता त्याच्यावर अमेरिकेत उपचार करण्यात येणार आहे.
वृत्तानुसार, शाहरुख खानच्या डोळ्यांना नेमकं काय झालंय, त्याच्यावर आता काय उपचार करता येईल, यासाठी अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

शाहरुख खानने मे महिन्यात सांगितले होते की, 2024 मध्ये आपण चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असणार आहे. शाहरुख खान लवकरच लाडकी लेक सुहाना सोबत ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सुहाना शाहरुखसोबत ॲक्शन करताना दिसणार आहे.
डंकी हा शाहरुखचा रिलीज झालेला मागील चित्रपट होता. हा चित्रपट मागील वर्षी नाताळाच्या दिवशी रिलीज झाला होता. या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सरासरी कमाई केली.
हेही वाचा :
डॉन दाऊद इब्राहिमच्या प्रेमात मंदाकिनी, दोघांचा ‘तो’ फोटो समोर येताच…
मुसळधार पावसात हलकी-फुलकी भूक लागली? मग झटपट बनवा पालक- पनीर कटलेट
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट: आरोपींच्या अटकेनंतर नवा तपास