कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्याचे मतदान (Kolhapur)काल संपल्यानंतर विविध संस्थांनी घेतलेल्या निवडणूक अंदाजातून कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, तर हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर विजयी होणार असल्याचा अंदाज विविध संस्थांनी वर्तविला आहे. प्रत्यक्ष मतमोजणी मंगळवारी (ता. ४) असून, त्याच दिवशी या निकालाचे चित्र स्पष्ट होईल.
देशभरात निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान झाले. लोकसभेसाठी(Kolhapur) काल मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज सायंकाळी जाहीर करण्यात आले. त्यात सर्वेक्षण केलेल्या सर्वच संस्थांनी जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्या आहेत.
सी-व्होटर, इलेक्ट्रॉल संस्था, लोकशाही, टीव्ही नाईन, साम आदी वृत्तवाहिन्यांसह अन्य विविध संस्थांनी राज्यातील त्या त्या जिल्ह्यांचा अंदाज जाहीर केला. कोल्हापुरात काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज विरुध्द महायुतीचे खासदार संजय मंडलिक अशी लढत होती. ही जागा काँग्रेस २५ वर्षांनंतर चिन्हावर लढत आहे. त्यात श्रीमंत शाहू महाराज यांच्याविषयी असलेला सन्मान, राजर्षी शाहू महाराजांचे वारस, पुरोगामी विचारांचे पाईक या मुद्यांवर सर्वच संस्थांनी शाहू महाराज हेच कोल्हापुरातून विजयी होतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.
चौरंगी लढत असलेल्या हातकणंगले मतदारसंघात ‘वंचित’ची मते सर्वच सर्वेक्षणात बेदखल करण्यात आली आहेत. २०१९ च्या निवडणुकीत या मतदारसंघात ‘वंचित’च्या उमेदवारास एक लाख २३ हजार मते पडली होती. त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांचा पराभव झाला होता.
यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांची शिवसेना ठाकरे गटाकडून ऐनवेळी जाहीर झालेली उमेदवारी, खासदार धैर्यशील माने यांच्याविषयीची नाराजी आणि श्री. शेट्टी यांची धरसोड भूमिका असे मुद्दे मांडत सर्वेक्षण केलेल्या सर्वच संस्थांनी सरूडकर या मतदारसंघातून विजयी होतील, असा अंदाज वर्तवला आहे. पण या मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण राहील, याचीही उत्सुकता आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा महामार्गाचे काम कोल्हापुरात पाडले बंद
उद्यापासून इचलकरंजीसह २१ ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर
धोनी या दिवशी घेणार निवृत्ती, BCCIही रोखू शकणार नाही- दिग्गजाचा दावा