आज 20 जुलै आजचा दिवस शनिवार हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा असणार आहे(la grace). गुरुदेव बृहस्पतीने नुकतंच धनु राशीत प्रवेश केला आहे तर कर्क राशीत सूर्य आणि शुक्र यांचा द्विग्रह योग जुळून आला आहे. त्याचबरोबर आषाढ महिन्यातील ही शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे त्यामुळे आज द्विग्रह योग, रवि योग, शुक्रादित्य योग आणि पूर्वाषाढ नक्षत्र असे शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा(la grace) पाच राशींना फार शुभ परिणाम होणार आहे. या पाच राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायक असणार आहे. आज तुमची कामाच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढलेली दिसेल. तुमचं आरोग्य देखील चांगलं असणार आहे. आज तुमची नवीन लोकांशी ओळख होईल. भेटीगाठी वाढतील. तसेच, समाजात चांगला मान-सन्मान मिळेल. जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती तुम्ही आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकता. आज नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार सुखकारक असणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ तर मिळेलच पण तुमच्या आत्मविश्वासातही चांगली वाढ झालेली दिसेल. विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाण्याची तयारी करू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा देखील तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे जे अनेक दिवसांपासून वाद सुरु होते ते आज संपुष्टात येतील. त्यामुळे पार्टनरबरोबर चांगला वेळ जाईल.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. शनिदेवाच्या कृपेने तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमची आर्थिक स्थितीदेखील चांगली असेल. विद्यार्थ्यांचं देखील अभ्यासात चांगलं मन रमेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असल्यामुळे तुम्ही त्यांच्याबरोबर चांगला संवाद साधू शकता. धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन देखील केलं जाण्याची शक्यता आहे.
मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुम्ही जे काही काम कराल त्यात तुमचं चांगलं मन रमेल. तसेच, योग्य वेळ आल्यावर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देखील मिळेल. त्यामुळे चिंता करू नका. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी कामाचा ताण आज जरा कमी असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याबरोबर तुमचे संबंध बिघडू शकतात. पण ते लवकरच सोडविण्याचा प्रयत्न करा.
मीन रास
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खसा असणार आहे. आजचा तुमचा जास्त कल अध्यात्माकडे असेल. समाजातील काही प्रभावशाली व्यक्तींशी तुमच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. फक्त तुम्ही तुमच्या वाणीत गोडवा ठेवण्याची गरज आहे. बाकी नशिबाची साथ तुमच्याबरोबर असल्याने तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ 14 तास होणार? आयटी कंपन्यांच्या प्रस्तावावर सरकार निर्णय घेणार
शाळेची भिंत कोसळली, मुलं पहिल्या मजल्यावरून थेट.. थरारक VIDEO व्हायरल
महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा