शरद पवारांचे 5 खासदार फोडा, तरच अजितदादांना केंद्रात मंत्रीपद?, खळबळजनक दावा समोर

देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी होऊन आठवडा पूर्ण झाला आहे. मात्र, अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार(political consulting firms) आणि नेते संजय राऊत यांनी टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी मंत्रीमंडळाच्या फॉर्म्युलाबाबत अत्यंत धक्कादायक दावा केला आहे. काल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली होती. यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे. अशात संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

आज संजय राऊत हे माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अत्यंत धक्कादायक दावा केला. “अजित पवार यांना अद्याप केंद्रात मंत्रिपद मिळालेले नाही. केंद्रात मंत्रिपद हवे असल्यास सहा खासदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे.

माझ्या माहितीप्रमाणे, शरद पवार गटाचे पाच खासदार(political consulting firms) फोडून घेऊन या, असे प्रफुल पटेल यांना सांगण्यात आलेले आहे. तेव्हा तुमचा सहा खासदारांचा कोटा पूर्ण होईल आणि तुम्हाला मंत्रिपद देण्यात येईल. आता जे कुणी फुटणार असतील त्या फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहीजे”, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत यांच्या या दाव्याने राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार हे लोक फोडू पाहत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनंतर शरद पवार एक मोठे नेते आहेत. जर कुणी त्यांच्याशी बेईमानी केली तर ती महाराष्ट्राशी बेईमानी केल्यासारखे होईल, असंही पुढे खासदार संजय राऊत म्हणाले.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला. “एकनाथ शिंदे यांच्या नाराजीला आता कुणी विचारत नाही. त्यांचा आनंद किंवा त्यांची नाराजी हा विषय दिल्लीसाठी संपलेला आहे. हे सगळे कळसूत्री बाहुली आहेत. हे सर्व गुलाम आहेत. गुलामांना बंडाची भाषा शोभत नाही. त्यांनी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे.काही लोकांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या बदल्यात हृदयविकाराचा झटका आला नाही म्हणजे झाले. पण त्यांच्यासाठी रुग्ण वाहिका ठेवल्या पाहिजेत”, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.

पुढे त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत देखील भाष्य केलं. आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेलेल्या नाहीत. आम्ही कोणताही निर्णय घेताना तीन पक्ष एकत्र बसून घेतो. तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, असं राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात भाजपला सर्वाधिक खाती जाणार असल्याची चर्चा आहे. उद्या 14 डिसेंबररोजी मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. यात भाजपकडे 21 खाती, शिवसेना शिंदे गटाकडे 13, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 9 मंत्रीपदं जाणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा :

मोठी बातमी : पुष्पा 2 फेम अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांकडून अटक

धमक्यांचं सत्र सुरूच…! आता RBI बँकेला बॉम्बनं उडवण्याची धमकी

फडणवीसांची लाडकी बहीण विधानपरिषदेवर; ‘या’ बहिणीला गिफ्ट मिळणार?