शरद पवार-अजित पवार एकाच मंचावर; एकमेकांकडे बघणंही टाळलं

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(political updates) बारामतीत एकाच मंचावरती आले असल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषीक कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने दोघं एकाच मंचावर आले आहेत.

या निमित्त बारामतीत निवडणुकांनंतर (political updates)पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले आहेत. त्यामुळं सर्व राजकीय विश्वाचं लक्ष्य या कार्यक्रमाकडे लागलं आहे. पवार काका-पुतणे एकाच मंचावर आले, मात्र अजितदादा, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांकडे बघितले देखील नाही. शिवाय एकमेकांना नमस्कार करणं देखील टाळल्याचं दिसून आलं.

अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर आले असले तरी देखील त्यांची आसन व्यवस्था एकमेकांच्या शेजारी करण्यात आलेली नाही. अजितदादा आणि शरद पवार यांची आसनव्यवस्था एकमेकांच्या शेजारी नाही. अजितदादा आणि शरद पवार यांच्या खुर्ची शेजारी अजित जावकर यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आलेली आहे. तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या खुर्चीत अंतर आहे. त्यामुळे अजितदादा आणि शरद पवार यांच्यात संवाद होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये एकमेकींच्या विरोधात लढलेल्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या देखील आज एकाच मंचावर आल्याचं दिसून आलं. या दोघी नणंद-भावजय या शेजारी-शेजारी बसल्या आहेत. बारामती लोकसभेची निवडणूक त्यांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती. त्यानंतर आता त्या कृषी प्रदर्शन कार्यक्रमात त्या एकत्र आल्या आहेत.

बारामती येथे कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा काका पुतण्या एकत्र येणार का? संवाद साधणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान त्यांनी एकाच मंचावर येताच एकमेकांकडे कटाक्ष टाकणं देखील टाळल्याचं समोर आलं आहे. यावेळी रोबोटकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आलं, यावेळी अजितदादाचा सत्कार करण्यासाठी रोबोटने स्टेजवर बुके आणलेत, स्टेजवर रोबोट आल्यावर अजितदादा खळखळून हसल्याचंही दिसून आलं.

हेही वाचा :

VIDEO : MBA कॉलेजमध्ये धक्कादायक घटना: कॉपी रोखल्याने शिक्षकाला मारहाण

नागा साधूंचं रहस्यमय जीवन: कुंभमेळ्यानंतर ते कुठे जातात?

सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई, चार जणांना ताब्यात घेतलं