भाजपचे निरीक्षक विजय रूपाणी व निर्मला सीतारामन हे मुंबईत(politics) दाखल झाले आहेत. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. रूपाणी यांनी मुंबईत दाखल होण्यापूर्वीच मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल, असं स्पष्ट केलंय. त्यामुळे महायुतीत आता देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार हे निश्चित झाल्याचं मानलं जातंय.
उद्या 5 डिसेंबर रोजी मुंबईतील(politics) आझाद मैदानावर महायुतीचा भव्य शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. महायुतीकडून विरोधी पक्षातील काही नेत्यांनाही या सोहळ्याचं आमंत्रण दिल जाणार आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, अमित शाह, जेपी नड्डा, नितीन गडकरींसह 9 केंद्रीय मंत्री आणि 19 राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल , हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी , मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव , राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा , आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्याचबरोबर महाविकास आघाडीतील काही नेत्यांना देखील सोहळ्याचं आमंत्रण देण्यात येणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण दिलं जाणार आहे. यावर आमंत्रण दिल्यावर यायचं की कोत्या मनासारखं राहायचं, हा उद्धव ठाकरेंचा प्रश्न असा टोला भाजप नेते प्रसाद लाड यांनी लगावला.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी राजकीय नेत्यांसह साधू संत व महतांचीही उपस्थिती असेल. भगवानगडाचे नामदेव शास्त्री महाराज, राधानाथ स्वामी महाराज, गौरांगदास महाराज , महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, कीर्तनकार प्रसाद महाराज अंमळनेरकर यांची सोहळ्याला उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री हा भाजपचाच असणार हे आता स्पष्ट झालं आहे. मंत्रिपदांबद्दल बोलायचं झाल्यास भाजपाला सर्वाधिक 20 मंत्रीपद, शिवसेना शिंदे गटाला 12 तर अजित पवार गटाला 9 मंत्रीपद मिळतील, अशी माहिती आहे. भाजपाला विधानसभेत तब्बल 132 जागांवर यश मिळालय. त्यामुळे सर्वाधिक मंत्रीपदे ही भाजपच्याच वाट्याला जाणार हे अगोदरपासूनच बोललं जात होतं
हेही वाचा :
नको काँग्रेस, नको राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा ‘एकला चलो रे’चा नारा?
‘तू तिथे कशाला…’, रोहित शर्माने यशस्वीला Adelaide विमानतळावरच झापलं; Video Viral
मोठ्या ग्रहांच्या हालचालीने ‘या’ राशींचं आयुष्य बदलणार; अपार लाभासोबत बरसणार धनसंपत्ती