नवी दिल्ली : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे(political news) अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८४वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंबासह प्रमुख नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या वाढदिवशी शरद पवारांनी दिल्लीत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसाला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
शरद पवारांच्या या दिल्लीतील वाढदिवसाच्या (political news)सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. केक कापल्यानंतर राष्ट्रवादीच्या एका नेत्याने तिथेच उपस्थित असलेल्या खासदार निलेश लंके यांना त्याच तलवारीने केक भरवला. या व्हिडिओची आता सर्वत्र जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
३५ मिनिटं अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर अजितदादांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ”आज साहेबांचा वाढदिवस आहे उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्या दोघांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही त्याठिकाणी आलेलो आहोत. दर्शन घेतलं, चहापाणी झालं, महाराष्ट्रातील इतर भागात काय सुरुय, परभणीमध्ये काय सुरुय यावर चर्चा झाली.
अनौपचरिक चर्चा आमच्यामध्ये झाली. तसेच अधिवेशन कधी आहे? मंत्रिमंडळ विस्तार कधी आहे? या विषयांवर देखील चर्चा झाली.”,असं अजित पवार या भेटीवर भाष्य केलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे या सर्वांना घ्यायला बाहेर उभ्या होत्या. त्यांनी सुत्रेना पवार यांना मिठी मारली, त्यानंतर आपला भाचा पार्थ पवार यांना देखील त्यांनी मायेने मिठी मारली. पक्ष दुरावले, विश्वासाला तडे गेले पण मनं नाही दुरावली… ते या भेटीवरुन दिसून येत आहे. दरम्यान, आज शरद पवार यांचा ८४ वा वाढदिवस आहे.
शरद पवार यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या राजकारणात वैचारिक विरोधाला कधी व्यक्तीगत विरोधामध्ये बदलू दिलं नाही. त्यामुळे शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. सर्वच पक्षात त्यांचे मित्र आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांना अनेक जण त्यांना शुभेच्छा देतील.
हेही वाचा :
भाजपचा मेगा प्लॅन तयार…! पुढील टार्गेट…
लाडकी बहीण :घराघरांत तपासणीची मोहिम; अपात्रांसाठी FIRचा इशारा
भर जत्रेत तरुणींचा जोरदार राडा; एकमेंकीना जोरदार धुतले;पहा VIDEO