2019 मध्ये सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची(politics) जाहीर सभा झाली होती. शरद पवार यांचं भाषण सुरू असतानाच मुसळधार पावसाला सुरुवात झाली मात्र शरद पवार यांनी भाषण थांबवलं नाही. समोर उपस्थित लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेऊन संपूर्ण भाषण ऐकलं. या सभेच संपूर्ण देशभर चर्चा झाली आणि भाजपचे उमदेवार उदयनराजे भोसले यांचा दारूण पराभव झाला. सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचारही अंतिम टप्प्यात असून शरद पवार यांची इंचलकरंजीत आज सभा पार पडली. या सभेतही पावसाने हजेरी लावली. यावेळी शरद पवार थांबले नाहीत. भर पावसातही त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं.
काँग्रेस (politics)शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये आज सभा पार पडली. महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या सभेसाठी शरद पवार इचलकरंजीमध्ये पोहोचले. सांगलीमधील रोहित पाटील यांच्यासाठी सभा पार पडल्यानंतर इचलकरंजीमध्ये शरद पवार मनद कारंडे यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान पाऊस आणि शरद पवार यांचं समीकरण पुन्हा एकदा जुळून आलं. नेमका हाच धागा पकडत शरद पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.
यावेळी बोलताना पावसावरून जोरदार फटकेबाजी केली. समोर उपस्थित लोकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्रामध्ये अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो, असं शरद पवारांनी जाहीर सभेत बोलताच समोरुन एकच जल्लोष झाला. यावेळी समोर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जोरदार प्रतिसाद देत शरद पवार यांच्या सभेत भर पावसातही जाण आणली. या सभेचीही राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे आपण कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवायचं आहे. सत्तेत बदल केल्याशिवाय पर्याय आपल्यासमोर दिसत नाही आणि सत्ता बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा, यापेक्षा इथे अधिक बोलावसं वाटत नाही. ही विधानसभेची निवडणूक आहे. महाराष्ट्राचा पाळणा कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे अनुभव काही चांगला नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा :
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आता “रात्रीस खेळ चाले”
अदानी शिंदेंचे नवे हिंदुहृदयसम्राट आहेत का?ठाकरेंच्या सेनेचा सवाल
बाळासाहेब कनेक्शनमुळे राज ठाकरेंचा मोठा निर्णय? मनसैनिकांचा हिरमोड