मुंबई: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी महाविकास आघाडीतील(political) वातावरण अगदी ढवळून निघालं आहे. त्यातच आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली.
यावळी मतदार यादीतील घोटाळा, वाढलेली मते , ईव्हीएममधील अफरातफर, पराभूत उमेदवारांचे निकालयासंदर्भात शरद पवार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनुसिंघवी यांच्यासोबत कायदेशीर बाबींवर चर्चा कऱण्यात आली. त्यानंतर येत्या एक-दोन दिवसांत हे पराभूत उमेदवार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात,अशी चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा (political)मतदारसंघाचे रमेश बागवे, हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप, कोपरगावचे संदीप वार्पे, खडकवासल्याचे सचिन दोडके, शिवाजीनगरचे दत्ता बहिरट,यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर आज रात्रीदेखील शरद पवार यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे.तसेच, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अभिषेक मनुसिंघवी यांच्यासोबतही बैठक होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
पोलीस दलातील भ्रष्टाचार मीरा बोरवणकरांच चिंतन
लग्नाचं आमिष, अल्पवयीन मुलीला पळवून नेलं अन् मग नको तेच घडलं
पुष्पा 2 रिलीज होताच फॅन्सने भररस्त्यात बाईकला लावली आग Video Viral