‘शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार तर अजित पवार कोण?’ बच्चू कडूंचा महायुतीला घरचा आहेर!

अमरावती : राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणूकीपूर्वीच राजकारण रंगले आहे(leader). नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान, भाजप पक्षश्रेष्ठी अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये भाजपने पुण्यामध्ये विधानसभेचे रणशिंग फुंकले. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले. अमित शाह यांनी देखील जेष्ठ नेते शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले.

यावेळी अमित शाह यांनी शरद पवार(leader) यांना भ्रष्ट्राचाराचे सरदार म्हणून टीका केली. यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली असून प्रत्युत्तर दिले जात आहे. या टीकेवरुन महायुतीला घरचा आहेर देखील मिळाला आहे. प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार तर अजित पवार कोण असा सवाल उपस्थित केला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना आमदार बच्चू कडू यांनी महायुतीबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहे. बच्चू कडू म्हणाले, अमित शाहांच्या तोंडातून चुकीचे निघाले असतील. ते बऱ्याचदा विसरून जातात आणि बऱ्याचदा चुकीचे बोलतात आणि मग अंगलट येते. शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील, तर अजितदादा कोण आहे? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. तसेच शरद पवार हे कधीच महायुतीमध्ये जाणार नाहीत. आणि अजित पवार यांनी शरद पवारांसोबत जाऊ नये असेही बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

पुण्यामध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे महाअधिवेशन पार पडले. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन पार पडले. यामध्ये राज्यातील नेत्यांसह अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अमित शाह म्हणाले की, शरद पवार यांनी आपल्या देशात भ्रष्टाचाराचे संस्थानिकीकरण केले आहे. ते भ्रष्टाचाराचे सरदार आहेत.

मी शरद पवारांना सांगायला आलो आहे की, महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यावर मराठा समाजाला आरक्षण मिळते आणि शरद पवारांचे एमव्हीए सरकार सत्तेवर आले की मराठा आरक्षण संपते. एवढी वर्षे सत्तेत असताना त्यांना दलित, आदिवासी आणि गरीबांसाठी काम करण्यापासून कोणी रोखले होते? राजीव गांधींचा नारा होता हम दो, हमारे दो, पण गेल्या 15 वर्षांपासून ते विरोधी पक्षात बसले आहेत.

हेही वाचा :

अरमान- कृतिकाच्या ‘त्या’ व्हिडिओवरून राजकारण तापलं…

भाजप चक्रव्यूहात; ‘धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतयं!’ अशी अवस्था

सुष्मिता सेन आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल पुन्हा दिसले सोबत; चाहते म्हणाले ब्रेकअपनंतर…