बारामती: विधानसभा निवडणुकीला काही तास शिल्लक राहिले असताना बारामतीतील राजकीय(political news) वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभेप्रमाणे यावेळीही बारामतीत चुरशीची लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर यावेळी बारामतीकर कुणाच्या पारड्यात आपली मतं टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे बारामतीचा दादा कोण, कोणते पवार सर्वात पॉवरफुल यावरही ठिकठिकाणी चर्चा रंगू लागल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी, शरद पवार हे लवकरच राजकारणातून(political news) निवृत्त होणार असून त्यानंतर बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही, त्यामुळे भावनिक होऊन मतदान करू नका, असं आवाहन केलं होतं. इतकेच नव्हे तर शरद पवार राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर हा पठ्ठ्याच तुमची काम करणार आहे. तिथं आपलं नाणं खणखणीत आहे. पण लोकसभेला गंमत केली तशी आता करू नका, असंही अजित पवार यांनी म्हटलं होतं.
अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर शरद पवारांनीही अजित पवारांना त्याच भाषेत सडेतोड उत्तर दिलं आहे. “लोकांनी आपल्याला वाली म्हटलं पाहिजे.हे स्वत:म्हणून काय उपयोग. उद्या कुणी म्हणालं की, मीच या देशाचा प्रमुख, तर तू म्हण बाबा माझी काही तक्रार नाही. पण, हे जनतेनेही म्हटलं पाहिजे ना. मी म्हणून काय उपयोग आहे”, असा सणसणीच टोला शरद पवारांनी लगावला. लोकसभेच्या निकालाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, ” गंमत म्हणजे काय? बारामतीकरांनी त्यांना मतं दिली नाहीत, हेच ना. दुसरं काय? पण कुणाला मतदान करायचं हा लोकांचा अधिकार आहे तो. त्यांना जे योग्य वाटलं ते केलं.”
दरम्यान, बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यात थेट लढत होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी बारामतीत केलेल्या विकासकामांबाबत मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
त्याचबरोबर शरद पवार यांनीदेखील सक्रीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याने बारामतीतत भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. बारामतीत लवकरच शरद पवार यांची सांगता प्रचारसभा होणार आहे. बारामतीकरांनी आतापर्यंत शरद पवारांनी सांगितलेल्या उमेदवारालाच पाठिंबा दिला आहे. त्यांच्या शब्द महत्त्वाचा असल्याने यावेळी शरद पवार कोणता शब्द देणार याकडेही मतदारांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
तेजीनंतर सोन्याचे दर पुन्हा घसरले, जाणून घ्या आजचे दर
आज शिव योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींना डबल लाभ
आजचे राशी भविष्य (17-11-2024) : astrology