शरद पवारांनी गेम पलटवला! बड्या नेत्याला मोठा धक्का

राज्यात विधानसभा निवडणुकांची(political) रणधुमाळी सुरु झाली आहे. यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. अशातच राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी देखील सुरु आहे. मात्र सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात उडत आहेत. अशातच विधानसभा निवडणुकी दरम्यान शरद पवार यांनी रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे.

यावेळी रयत क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार(political) गटात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी पांडुरंग शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी जळगावमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. मात्र यावेळी पांडुरंग शिंदे यांनी रयत क्रांती संघटना सोडण्यामागचे कारण देखील सांगितले आहे.

सदाभाऊ खोत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. परंतु मला ही टीका पटली नाही. त्यामुळे मी आता हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं पांडुरंग शिंदे म्हणले आहेत. तसेच सध्या सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून देखील लांब गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचे काम हे व्यक्ती केंद्रीत झाले आहे अशी टीका पांडुरंग शिंदे यांनी केली आहे.

सध्या सदाभाऊ खोत यांच्या विषयी पक्षातील अनेक दिग्गज नेतेमंडळी व कार्यकर्ते देखील नाराज असल्याचं दिसून येत आहे. कारण सध्या माझ्या संपर्कात जिल्ह्यातील तब्बल 25 कार्यकर्ते आहेत. मात्र ते देखील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचा दावा पांडुरंग शिंदे यांनी केला आहे.

मात्र आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने सदाभाऊ खोत यांना हा सर्वात मोठा धक्का बसला असल्याचे म्हंटले जात आहे.

हेही वाचा :

बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुखचं ‘कशी ओढ’ गाण प्रदर्शित!

बाळासाहेबांवरुन राज ठाकरेंनी डिवचलं! राऊतांकडून मोजून 9 शब्दात उत्तर; म्हणाले, ‘राज ठाकरे काय…’

आकाश पाळण्यात बसली अन् डोक्याची कवटीच उडाली! केस अडकले, हळूहळू…; अंगाचा थरकाप उडवणारी घटना