राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) खासदार प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा(political)जिरेटोप घालून सत्कार केल्याने वादाला तोंड फुटले आहे. हा छत्रपती शिवरायांचा अपमान असल्याचे सांगत विरोधकांनी प्रफुल पटेल यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याबाबत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी पटेल यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
“जिरेटोप आणि महाराष्ट्राचा(political) इतिहास आहे. तो जिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ओळखला जातो. लाचारी असते नाही असं नाही, पण लाचारीलाही मर्यादा पाहिजे पण सर्व मर्यादा त्या लोकांनी सोडल्यात. एक चांगलं झालं त्यांनी पुन्हा काळजी घेऊ, असं सांगितले,” अशा शेलक्या शब्दात शरद पवार यांनी प्रफुल पटेलांचा समाचार घेतला.
यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकली शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या टीकेवरुनही शरद पवार यांनी निशाणा साधला. “त्यांना बोलायला काही नाही म्हणून ते वारंवार हे बोलत आहेत. शिवसेना आणि शिवसैनिक आज पुन्हा बरोबर आहे, आज महाराष्ट्रात कुठे गेला तरी शिवसैनिक उद्धव ठाकरेंबरोबर आहे,” असे ते म्हणाले.
शरद पवार यांनी फोडाफोडीचे राजकारण केले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावरही शरद पवार यांनी जोरदार पलटवार केला. “राज ठाकरेंचे महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की काय स्थान आहे हे मला माहीत नाही. नाशिक हा त्यांचा स्ट्रॉंग बेस आहे, असे म्हणतात मात्र तसे मला नाशिकमध्ये दिसत नाही. असा टोला त्यांनी मनसे अध्यक्षांना लगावला.
हेही वाचा :
‘भाजपला राजकारणात पोरंच होत नाही म्हणून गद्दार मांडीवर…’, उद्धव ठाकरेंचा घणाघात
कोल्हापूरात जलप्रदुषणामुळे पंचगंगा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी, मनसेकडून माशांचं पिंडदान
यंदा आयपीएलचं जेतेपद कोण पटकावणार?ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने जाहीर केलं संघाचं नाव!