राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका(political) होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 288 जागांवर महाविकास आघाडी (political)यांच्यात जागावाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. जवळपास 17 जागांवर एकमत होऊ शकलं नसल्याची चर्चा आहे. याआधी अनेक इच्छुक उमेदवारांकडून तिकिटासाठी फिल्डिंग लावली जात आहे. शरद पवार गटात तर इच्छुकांची रांग लागल्याचं दिसतंय. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षात प्रवेश केलाय. अशात आणखी एक नेता शरद पवार गटात प्रवेश करणार आहे.
सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उदय सांगळे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. ते आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे हा पक्ष प्रवेश होणार असून उदय सांगळे हे सिन्नरमधून शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे.
विधानसभेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असून निवडणुकीच्या तोंडावरच उदय सांगळे शरद पवार गटात दाखल होणार आहेत. असं झाल्यास उदय सांगळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून तिकीट मिळाले तर सिन्नरमध्ये उदय सांगळे विरुद्ध माणिकराव कोकाटे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
उदय सांगळे यांचा सिन्नरमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. ते विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करू शकतात. त्यामुळे शरद पवारांकडून उदय सांगळे यांनी तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
‘भाऊ, मी हरलो, माफ करा…’, करवा चौथच्या दिवशी पती-पत्नीची आत्महत्या, पत्नीने रेल्वेसमोर उडी मारली तर पतीने…
‘कर्णधार चुकत असेल तर मग प्रशिक्षकाचं काय काम?’, माजी भारतीय क्रिकेटर संतापला
कागलच्या राजकारणात जाळ अन् धूर संगटच; मुश्रीफ- समरजित यांच्यात आरोप प्रत्यारोप