राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात विधानसभा(political) निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. यानंतर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशात अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत.
शरद पवारांच्या(political) पक्षात इच्छुकांनी रांग लावली आहे. अशात आणखी एका नेत्याने शरद पवार गटात प्रवेश केलाय. मुरबाडमध्ये एकनाथ शिंदे यांचा सुपाडा साफ झाल्याचं समोर आलं आहे.
शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी तुतारी फुंकली आहे. त्यामुळे भाजपचे आमदार किसान कथोरे यांच्या समोर अडचणी वाढणार आहेत.
रविवारी भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर, आमदार किसन कथोरे यांना येथून उमेदवारी जाहिर करण्यात आली. मात्र, सुभाष पवार यांनी आपण निवडणूक तर लढणारच, असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात जाणार हे निश्चित मानलं जात होतं.
सोमवारी (21 ऑक्टोबर) रोजी सुभाष पवार यांनी आपल्या पक्षाला राम राम ठोकला खरा मात्र, त्यांनी शरद पवार राष्ट्रवादी पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि माजी आमदार गोटिराम पवार यांच्या उपस्थितीत सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी प्रकाश पवार, धनाजी दळवी, रामभाऊ दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्या प्राजक्ता भावर्थे हे देखील शरद पवार गटात आले आहेत. दरम्यान, या प्रवेशासोबतच सुभाष पवार यांना पक्षातर्फे उमेदवारीही मिळाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता किसन कथोरे विरूद्ध सुभाष पवार असा सामना होणार आहे.
हेही वाचा:
फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी जबरदस्त SUV लाँच
भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा
लाडक्या बहिणींना मिळणार 5 हजारांचा बोनस? महिला व बालविकास विभागाने स्पष्टच सांगितलं