शशांक-आशुतोषची झंझावाती खेळी व्यर्थ,

आयपीएल २०२४ च्या २३ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (IPL)पंजाब किंग्जचा पराभव केला. हैदराबादने रोमांचक सामन्यात पंजाबचा २ धावांनी पराभव केला.

शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा पंजाब किंग्जसाठी सामना जिंकण्यात अपयशी ठरले. हैदराबादने केलेल्या १८३ धावांच्या प्रत्युत्तरात पंजाबने केवळ १५.३ षटकांत ६ गडी गमावून ११४ धावा केल्या होत्या. यानंतर शशांकने २५ चेंडूत ४६ धावा आणि आशुतोषने १५ चेंडूत ३३ धावा करत आपल्या संघाला जवळपास विजय मिळवून दिला. (IPL)मात्र हैदराबादने शेवटच्या चेंडूवर २ धावांनी विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादने हा सामना जिंकून स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला.

सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १८२ धावा केल्या. नितीश रेड्डीने ३७ चेंडूत ६४ धावांची खेळी खेळली. अब्दुल समदनेही १२ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. पंजाब किंग्जने लक्ष्याचा पाठलाग करताना १८० धावा केल्या. पंजाबचे आघाडीचे ३ फलंदाज फ्लॉप झाले पण शशांक सिंगने २५ चेंडूत नाबाद ४६ आणि आशुतोष शर्माने नाबाद ३३ धावा करून संघाला लढण्याची संधी दिली. सिकंदर रझाने २८ आणि सॅम कुरनने २९ धावांचे योगदान दिले.

सनरायझर्स हैदराबादसाठी युवा फलंदाज नितीश रेड्डी याने ३७ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ६४ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय कोणीही विशेष काही करू शकले नाही. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत ४ षटकांत एकूण चार बळी घेतले, तर सॅम कुरन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना जिंकून सनरायझर्स संघाला चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करण्याची संधी होती. हैदराबाद संघाने सामना जिंकला मात्र केवळ 2 धावांचा फरक त्यांना चेन्नईच्या पुढे नेऊ शकला नाही. अशाप्रकारे हैदराबाद संघ ३ सामने जिंकूनही पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाबचा संघ सहाव्या स्थानावर आहे.

हेही वाचा :

शाहरुख खान याच्या मुलासोबत ऐश्वर्याची लेक आराध्याचं लग्न? फोटो पाहून संतापले चाहते.

महाविकास आघाडीचं ठरलं! जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर; सांगलीत कोण?

खंडणी द्या, अन्यथा किडनी विकू; अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू