अभिनेता नागा चैतन्य आणि पत्नी शोभिता धुलिपाला हे (dramatic)लग्नानंतर पहिल्यांदाच एका मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलले. या मुलाखतीमध्ये दोघांनीही एकमेकांच्या गमतीशीर सवयी, मतभेद, आणि नात्यातील मजेशीर गोष्टी शेअर केल्या. विशेष म्हणजे, नागा चैतन्यने शोभिताला “ड्रामेबाज” असे म्हटले आणि त्यामागचं कारणही सांगितलं! लग्नाच्या तीन महिन्यांनंतर नागा चैतन्य आणि शोभिता हळूहळू सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाले आहेत. युरोप ट्रिपपासून ते एकत्र मुलाखती देण्यापर्यंत, हे नवं जोडपं चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या नव्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या नात्यातील गमतीशीर आठवणी शेअर केल्या.

सवयी, नखरे आणि “ड्रामेबाजी” :
मुलाखतीत नागा चैतन्यने शोभिताच्या काही सवयींवर नाराजी व्यक्त करत तिला “ड्रामेबाज” म्हटलं. त्याने सांगितलं की आजारी असताना शोभिता थेट बेशुद्ध पडते, आणि तो हे नाटक वाटतं. त्यावर शोभिता म्हणाली, “मी खरंच आजारी असते!” दोघांनीही एकमेकांची खिल्ली उडवत हास्यविनोद (dramatic) केला.तेव्हा दोघांपैकी कोण आधी माफी मागतो, असा प्रश्न विचारण्यात आला असता, शोभिता म्हणाली ती आधी सॉरी म्हणते. मात्र चैतन्यने लगेचच टोमणा मारत म्हटलं, “तिला सॉरी आणि थँक्सवर विश्वासच नाही.” अशा छोट्या कुरबुरींनी दोघांचं नातं अधिकच गोड वाटत होतं.
स्वयंपाकाच्या बाबतीत दोघांनी कबूल केलं की त्यांच्यापैकी कोणीही स्वयंपाकात पारंगत नाही. मात्र शोभिताने सांगितलं की नागा तिला रात्री हॉट चॉकलेट बनवून देतो. त्यावर चैतन्यने स्पष्ट केलं, “हे स्वयंपाक नाही, हे फक्त गरम पाणी आणि चॉकलेट आहे.”जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की (dramatic)कोण जास्त रोमँटिक आहे, तेव्हा दोघांनीही नागा चैतन्यचं नाव घेतलं. शोभिताने त्याला “प्रेरणादायी” आणि “मजेशीर” अशी उपमा दिली. मात्र गाडी चालवण्याच्या बाबतीत तिने म्हटलं, “मी गाडी चालवत नाही, मी लोकांना वेडं करते.”

चित्रपटाच्या गप्पांमध्ये चैतन्यने शोभितावर टोला मारत म्हटलं की, “तिला अजूनही माझे चित्रपट बघण्याची गरज आहे.” यावर शोभिताने हसत उत्तर दिलं की, “मी त्याच्याच चित्रपटांपासून सुरुवात करणार आहे!”
हेही वाचा :
मार्चचा शेवटचा आठवडा गेमचेंजर ठरणार! ‘या’ 3 राशींचा गोल्डन टाईम सुरू
प्रियकरासह समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी आली होती प्रेयसी, पण… Video Viral
‘खल्लासच करतो’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हा