प्रेम करताना वेळ, जागा कधीही पाहू नये असे म्हटले जाते. जसजसा काळ बदलला तसतशा प्रेमाच्या व्याख्याही बदलल्या. आजकाल तरुण तरुणी कोणत्याही गोष्टीचे भान न ठेवता सार्वजनिक ठिकाणी नको ते चाळे करू पाहतात. सर्वांसमोर आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करू लागतात असे करताना आजूबाजूच्या परिसराचा ते विचार करत नाहीत(Video). प्रेम व्यक्त करताना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवणेही तितकेच गरजेचे असते. आपल्यामुळे इतरांना त्रास तर होत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे.
सोशल मीडियावर नेहमीच प्रियकर प्रेयसीचे अनेक व्हिडिओज(Video) व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा ते नको ते चाळे करताना दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक कपल चालू रस्त्यावर कारमध्ये बसून अश्लील कृत्य करताना दिसून येत आहे. त्यांच्या या लज्जास्पद कृत्याचा व्हिडिओ सध्या वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात असून लोक यावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला नक्कीच थक्क करतील. व्हिडिओत नक्की काय घडले? चला जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर पुन्हा एकदा कपलच्या अश्लील कृत्याचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहिले तर तुम्हाला दिसेल की यात, एक कपल चालू चारचाकीत भान हरपून लज्जास्पद कृत्य करत आहेत. ही घटना नागपूरात धरमपेठ परिसरातील आहे.
यात प्रेयसी आपल्या प्रियकराच्या मांडीवर बसून त्याला किस करताना दिसून आली. विशेष म्हणजे, दोघेही हे कृत्य चालू गाडीत असताना करत होते. चालू गाडीत असे करणे धोकादायक ठरू शकते, यामुळे जीव जाण्याची शक्यता असते. यामुळे भयंकर अपघात देखील होऊ शकतो.
कपलचा हा लज्जास्पद व्हिडिओ @vidarbh.kida नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘धावत्या कारमध्ये अश्लील चाळे’ असे लिहिण्यात आले आहे . अनेकांनी यावर कमेंट्स करत कपलच्या या कृत्यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे , त्यांची कार आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे,”कायदेशीर कारवाई करा आणि स्थानिकांनी धरून बडवा”.
हेही वाचा :
कांद्याच्या दरात घसरण, शेतकरी आक्रमक
अजितदादांच्या राष्ट्रवादीत महाभूकंप होणार? अंतर्गत हालचाली वाढल्या
चाहत्यांच्या प्रतीक्षेची परिसीमा! 9 जानेवारीला OTT वर ‘पुष्पा 2’ प्रदर्शित होणार की नाही?