बंगालच्या उपसागरात धडकलेल्या चक्रीवादळाचा दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रालाही फटका बसत असल्याचं दिसतंय. राज्यात पावसाच्या धास्तीने शेतकऱ्यांना(Farmers) साठवणुकीतला शेतमाल विकण्याची पाळी आली आहे, तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पावसाचा शेवग्याच्या लागवडीला मोठा फटका बसला आहे.
शेवग्याच्या शेंगा उष्ण असल्याने थंडीत किरकोळ बाजारात शेवग्याच्या शेंगांना मोठी मागणी असते. पण मागणीच्या तुलनेत सध्या बाजारात आवक कमी झाली आहे. परिणामी किलोमागे शेवग्याला प्रतवारीनुसार 500 ते 600 रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांनीही शेवग्याकडे पाठ फिरवली आहे.
शेवग्याच्या शेंगांना चांगला भाव मिळत असला तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना(Farmers) मात्र याचा फायदा होत नसल्याचं सांगण्यात येतंय. सध्या बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये शेवगा येत असल्याचं शेतकऱ्यांना फटका बसल्याचं बारामतीतील शेवगा उत्पादक शेतकरी विष्णुपंत हिंगणे यांनी सांगितलं. विष्णुपंत हिंगणे यांचा चार एकर शेवगा आहे.
परंतु यंदाच्या वर्षी पाऊस जास्त पडल्याने फुलगळ तसेच रोगाला बळी पडला आणि त्यामुळे यंदा त्यांचं चार एकरातून सात ते आठ लाखाचं नुकसान झालं असल्याचं हिंगणे सांगतात. पुण्याच्या बाजारसमितीत क्विंटलमागे मंगळावारी 03 डिसेंबर रोजी शेवग्याच्या शेंगांना क्विंटलमागे किमान ५००० रुपयांचा भाव मिळाला. आज मार्केटयार्डात 19 क्विंटल शेवग्याची आवक झाली होती.
मुंबई ठाणे व पुणे सह अन्य शहरातील बाजारात शेवग्याच्या दराने सध्या उच्चांक गाठला आहे. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात शेवग्याची सर्वाधिक लागवड केली जाते. इतर वेळेस 100 ते 120 रुपये किलोंच्या आसपास असणाऱ्या शेवग्याला दक्षिणेकडील परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला.
परिणामी घाऊक बाजारात दहा किलोंचा दर 3500 ते 4000 रुपयांपर्यंत गेला आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही शेवग्याची आवक रोडावली होती. डिसेंबर अखेरीस शेवग्याची आवक वाढेल असे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे ग्राहकांना शेवग्याच्या शेंगांच्या वरणासाठी डिसेंबरअखेरपर्यंत थांबावे लागणार आहे.
राज्यात यंदा झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लांबलेला मान्सून तसेच परतीचा पाऊसही रेंगाळल्यानं पिकं पाण्याखाली गेली, उभी पिके आडवी झाली. शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. आता हिवाळ्याची चाहूल लागलेली असतानाच बंगालच्या उपसागरात धडकलेल्या फेंगल चक्रीवादळानंही रब्बी पिकांसह शेतकऱ्यांचे कॅश क्रॉप धोक्यात आले आहेत.
याचाच परिणाम म्हणजे पावसामुळे साठवणूकीतला कांदा नासेल या धास्तीनं शेतकऱ्यांनी मार्केटयार्डाबाहेर लिलावासाठी लावलेल्या रांगा. तर दुसरीकडे शेवग्याच्या शेंगांच्या उत्पादनावरही यंदा परिणाम झाल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. कर्नाटक, तमिळनाडूमधून शेवग्याच्या येणारा मालही कमी असल्याने शेवग्याचा भाव किलोमागे 600 रुपयांवर गेला आहे. परिणामी ग्राहकांनी शेवग्याच्या शेंगाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचं समोर येत आहे.
हेही वाचा :
मनोज जरांगे पाटील, पुन्हा आमरण उपोषणाच्या मैदानात!
EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचीही उडी, राज्यभरात उभारणार जनआंदोलन
अभिनेत्री समुद्र किनाऱ्यावर योगा करत असताना लाटांच्या तडाख्यात गेली वाहून Video