शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री..; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

दोन दिवसांनी म्हणजेच येत्या 20 नोव्हेंबररोजी महाराष्ट्रात मतदार(current political issues) पार पडणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे. या दोन्ही आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. मात्र, सगळ्याच पक्षातील कार्यकर्त्यांकडून आप-आपल्या नेत्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला जातोय.

अशात महाविकास आघाडीच्या एका बड्या नेत्याने एक खळबळजनक(current political issues) दावा केलाय. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठं वक्तव्य केलंय. महायुतीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री बनवण्याचं ठरवलं असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत.

“मला आता मुख्यमंत्रीपदामध्ये रस नाही, मी या रेसमध्ये नाही, असं देवेंद्र फडणवीस बोलत असले तरी भाजपने मुख्यमंत्री एकनात शिंदे आणि अजित पवारांचा पत्ता कट करुन फडणवीसांना मुख्यमंत्री करायचे ठरवले आहे.”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगते आहे.

फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचंय, हे सत्य आहे. अन्यथा, ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा कशातून आली, असा खोचक सवालही जयंत पाटील यांनी केलाय. खरं म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना फोडताना देवेंद्र फडणवीस यांना स्वत:ला मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

अमित शाहदेखील तीनदा बोलले आहेत की, पुढचं सरकार भाजपचं म्हणजे मुख्यमंत्री भाजपचा. देवेंद्रजी नेतृत्व करतील. अमित शाह ही गोष्ट बोलतात, याचा अर्थ हे मोदींनाही मान्य आहे. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट होणार हे ठरलेलं आहे, असा दावाच जयंत पाटील यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे की नाही, हे लहान पोरगंही सांगेल. राज्यात महायुतीची सत्ता येणार नाही. पण चुकून महायुती सत्तेत आली तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असंही जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा :

 लग्नसराई सुरु होताच सोन्याचे भाव घसरले!

मतदानाच्या दोन दिवसआधी भाजपचा मोठा डाव, ठाकरे गटाला धक्का

मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना ‘या’ उमेदवारावर जीवघेणा हल्ला, कोल्हापुरात खळबळ