दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शिंदे सरकारची ‘सोनेरी’ भेट; ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अर्ज मुदतीस वाढ

मुंबई : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे शिंदे सरकारने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना गिफ्ट(gift) दिले असू, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता लाडक्या बहीणी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

या योजनेचा लाभ(gift) आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात आली आहे. 5 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत या योजनेत अर्ज करता येणार असून, अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे.

आमचं सरकार लाडक्या बहिणींच्या मागे उभे रहाणारे सरकार आहे म्हणून आम्ही ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे लाडक्या बहिणींचे खात्यात एका क्लिकवर दिले आणि आमचं सरकार बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार आहे, हफ्ते घेणारे सरकार नाही असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लावला.

सुप्रसिद्ध गायिका आशाताई भोसले यांनीदेखील विरोधकांना चांगली चपराक दिल्याचे म्हणत लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे आणि विरोधकांची तोंड काळी झाली आहे असे शिंदे म्हणाले होते. ही योजना यशस्वी राबवण्याची सरकारने जबाबदारी घेतली आहे आणि गरिबांच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावू नका. या योजनेत कुणी खोडा घातला तर येणाऱ्या निवडणुकीत लाडक्या बहिणी तुम्हाला खोडा घातल्या शिवाय राहणार नाहीत असंदेखील शिंदे म्हणाले.

हेही वाचा:

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला करणार रामराम? हरभजनने केला मोठा खुलासा

IRCTC चं नोव्हेंबर स्पेशल टुर पॅकेज, ‘या’ मंदिरांना स्वस्तात भेट देण्याची संधी!

रतन टाटा यांचा वारसदार ठरला! ‘या’ व्यक्तीवर सोपवली जबाबदारी