मुंबईः शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त गुरुवारी मुंबईमध्ये(attack) ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वतीने कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजप, नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली. मोदींना उद्देशून केलेल्या टीकेला शिंदे गटाकडून उत्तर देण्यात आलेलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, येणाऱ्या विधानसभा(attack) निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांचा फोटो न वापरता प्रचारात उतरुन दाखवावं, मोदीजी मी तुम्हाला आमंत्रण देतो विधानसभेचा प्रचार आतापासूनच सुरु करा.. मी आहे आणि तुम्हीही आहात. मिंद्द्यांच्या वडिलांचा फोटो वापरुन मतं मागवून दाखवा.
ठाकरे पुढे म्हणाले होते की, नाव, वडील आणि धनुष्य न वापरता महायुतीने मतं मागवून दाखवावीत. माझ्या वडिलांचा फोटो लावून स्ट्राईकरेट काय सांगता? असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वडिलांचा फोटो वापरावा, असं आवाहन केलं.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या नावावरुन ते असं म्हणत असतील तर मग त्यांनाही शिवाजी महाराजांचे पुतळे, बाबासाहेबांचे पुतळे किंवा त्यांचं नाव वापरता येणार नाही, कारण तेही कुणाचेतरी वडील होते.
शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही मतं मागता, बाबासाहेबांचं नाव तर आत्ता कुठे लोकसभेपासून आठवावायला लागलं आहे.. असं म्हणत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.
हेही वाचा :
प्रेग्नंट दीपिकाला मदत करण्यासाठी अमिताभ बच्चन पुढे आले तेवढ्यात प्रभासनं…
इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना लागणार लॉटरी; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भयंकर! बंदुकीच्या धाकावर पोलीस उपनिरीक्षकानेच केला महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार