शिंदे सेनेचा विधानसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर, ‘या’ आमदाराला दिली संधी

राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपल्या आहेत. एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपाचा निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही तर दुसरीकडे काही नेत्यांची उमेदवारी जाहीर केली जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाची उमेदवारी जाहीर केली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपला पहिला उमेदवार(candidate) जाहीर केला आहे.

रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. महायुतीत रामटेक विधानसभेची जागा कोण लढेल यावरुन खल सुरु आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल यांना उमेदवार(candidate)जाहीर केली आहे.मात्र ही जागा भाजप लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र आता या ठीकाणी मुख्यमंत्री शिंदेंनी उमेदवार घोषित केल्याने भाजपच्या इच्छुकांना मोठा धक्का बसला आहे.

2019 मध्ये आशिष जयस्वाल लहे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर काही अपक्ष आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. त्यात आशिष जयस्वाल यांचाही समावेश आहे. आशिष जयस्वाल यांनी गुवाहाटीत शिंदे यांना पाठिंबा दिला. आशिष जयस्वाल यांना महायुतीची उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपच्या नव्या स्थानिक नेत्यांकडून होत होती.

दरम्यान महायुतीमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील जागा वाटप आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. महायुतीमध्ये भाजप 150 ते 160 जागा लढवणार असल्याची माहिती आहे. तर, उर्वरित जागा या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार असल्याची चर्चा आहे. महायुतीमधील इतर घटक पक्षांना कोणत्या जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट नाही.

हेही वाचा:

देशातील सर्वात मोठ्या संस्थेत नोकरीची संधी; कुठे कराल अर्ज?

प्रवाशांना मोठा दिलासा! एसटी महामंडळाची हंगामी दरवाढ रद्द…

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान