शिंदेंची डोकेदुखी वाढली; शिलेदारांमध्ये जुंपली; महायुतीतील वातावरण तापले

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडल्यानंतर सत्ताधारी व विरोधक(headache) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. त्यातच आता सत्ताधारी पक्ष असलेल्या महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे पहावयास मिळत नाही. शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप एकीकडे होत आहे.

खासदार कीर्तिकर यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी(headache) होत आहे. दुसरीकडे शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांनी कीर्तिकर यांची बाजू घेत त्यांच्यावर टीका करू नका अन कीर्तीकर यांच्यावर कारवाई झाली तर आम्ही देखील विचार करू, असा इशारा दिल्याने शिंदे सेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. दुसरीकडे भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली असल्याने या प्रकरणामुळे महायुतीत मिठाचा खडा पडला आहे.

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर खासदार कीर्तिकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात काही जण टीका करीत आहेत, मात्र त्यांच्यावर आरोप करण्यापूर्वी ते काय म्हणाले आहेत हे समजून घेऊन टीका करा, असा घरचा आहेर शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे.

खासदार किर्तीकर यावेळी म्हणाले की, मी माझ्या मुलासाठी काम करू शकलो नाही, याची माझ्या मनामध्ये खंत आहे. खंत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्यांनी त्यांच्या मुलासाठी काम केलेले नाही. कुठल्याही वडिलांना असे वाटणं स्वाभाविक आहे. मी जोगेश्वरीत गेलो होतो. बैठक घेतली. बऱ्याच पदाधिकाऱ्यांना भेटलो. पुराव्यानिशी बोलावे, आरोपासाठी आरोप नको असेही आनंदराव अडसूळ यांनी स्पष्ट केले.

शिवसेना शिंदे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी खासदार किर्तीकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाई होऊ देणार नाही. त्या उलट अशी मागणी करणाऱ्या शिशिर शिंदे यांच्यावर तीनदा कारवाई करावी. “माणसाने विचार केला पाहिजे, मी कोणावरती बोलतोय. ज्याने अनेक वर्ष काम केलय, अशा माणसावर आरोप करताना आपण कोण आहोत? आपण किती छोटे आहोत? अशा शब्दात आनंदराव अडसूळ यांनी शिशिर शिंदे यांना सुनावले आहे.

येत्या काळात कीर्तीकर यांच्यावर कारवाई झाली तर आम्ही देखील विचार करू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम्हाला राज्यपाल करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत बोलू नये. त्यामुळे महायुतीमध्ये मतभेद आहेत, अशी टीका केली जाईल, असेही अडसूळ म्हणाले.

गजानन किर्तीकर यांच्या भूमिकेवर भाजप नेते आशिष शेलारांनी टीका केली. महायुतीचा उमेदवार निवडून आणणं, हे महायुतीमधल्या सर्व पक्षांच काम आहे. गजानन किर्तीकर यांचे हे विधान, त्यांची भूमिका महायुतीच्या युती धर्माला छेद देणारी आहे, आम्ही याचा निषेध करतो, असे शेलार म्हणाले होते.

हेही वाचा :

अजय देवगणचा सिंघम अगेनमधील फर्स्ट लूक आउट

“केजरीवालांच्या निवासस्थानी घडलं ‘द्रौपदीचं वस्त्रहरण’”; भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त विधान

नातेवाईकांना फोन करून तरुणाची ‘पंचगंगे’त उडी…