गृहमंत्री(Political) पद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस हफ्तेवसुली करतात, सामान्यांच्या प्रश्नांऐवजी मलाईदार समस्यांना प्राधान्य देतात. यामुळं सरकार बदनाम होत आहे, अशी थेट तक्रार खासदार श्रीरंग बारणेंनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंकडे पत्राद्वारे केली आहे. शिंदे गटाच्या खासदार बारणेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे असणाऱ्या गृहविभागाबाबत असे प्रश्न उपस्थित केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत (Political)एबीपी माझाशी बोलतना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ‘मी काल पोलीस आयुक विनयकुमार चौबे यांना भेटून एकंदरच पिंपरी चिंचवड शहरांमधील नागरिकांच्या तक्रारी मांडल्या आहेत. सामान्य नागरिक पोलीस स्टेशनला तक्रार देऊन गेल्यानंतर त्याची दखल तात्काळ घेतली जात नाही, त्याला अपमानास्पद वागणूक दिली जाते. पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं जातं आणि एखादी तक्रार घेण्यासाठी दिरंगाई केले जाते, असे अनेक प्रकार झाल्याचे सर्व सामान्य नागरिक सांगतात. त्या दृष्टिकोनातून चौबे यांना भेटून मी रीतसर पत्र दिले आहे. असे गैरप्रकार अनेकदा घडतात आणि हे सर्रास चाललेलं आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी काल पोलीस आयुक्तांना भेटून पत्र दिलं आहे,’ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
मी आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये सर्वसामान्यांची दखल घेतली जात नाही, या अनुषंगाने पत्र दिलेलं आहे, एकंदरच पोलिसांचा कारभार जर पाहिला तर यामध्ये दिसून येते ते कोणालातरी पाठीशी घालण्यासाठी हे करत आहेत, आणि हे नाकारून चालणार नाही. काही प्रमाणामध्ये जमिनीच्या केसेस असतात किंवा अतिक्रमण केलं जातं किंवा जो बांधकाम व्यवसाय काही यामध्ये जास्त लक्ष घालतात. मात्र सर्वसामान्यांच्या तक्रारीमध्ये ते लक्ष घालत नाहीत या संदर्भात मी स्वतः भेटून तक्रार केली आहे, श्रीरंग बारणे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितला आहे.
काही पोलीस ठाण्यांबाबत माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या. यामध्ये हिंजवडी पोलीस स्टेशन, वाकड पोलीस स्टेशन, काळेवाडी पोलीस स्टेशन, सांगवी पोलीस स्टेशन, मालदार पोलीस स्टेशन आहेत. त्या ठिकाणच्या तक्रारी सर्वाधिक येतात आणि सर्वसामान्य माणसाच्या तक्रारी आम्ही घेतले आहेत या अनुषंगाने निकाल पोलीस आयुक्तांना भेटून आपण याबाबतीत गंभीर्याने दखल देऊन सर्वसामान्य माणसांना संरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांच्या तक्रारीकडे दखल दिली पाहिजे असं सांगितलं आहे असेही पुढे श्रीरंग बारणे यांनी म्हटलं आहे.
राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे, एक सक्षम नेतृत्व देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्याला मिळालेला आहे. राज्याच्या जनतेने मोठा विश्वास देऊन पुन्हा एकदा सत्ता दिली आहे. म्हणून अशा प्रकार होत असतील ते थांबले पाहिजेत. सरकार कुठे बदनाम होता कामा नये, या दृष्टिकोनातून एक लोकप्रतिनिधी म्हणून मी ही बाब गांभीर्याने पोलीस आयुक्तांकडे दाखल केलेली आहे. पोलीस खात्याने कोणतेही गैरकृत्य करणारा तो जर सत्तेमध्ये असेल किंवा सत्तेमध्ये नसेल याबाबतीमध्ये त्याला पाठीशी घातलं नाही पाहिजे. जी बाब योग्य आहे त्याबाबतीत पोलीस खात्याने निर्णय घेतले पाहिजेत. सत्ता असो किंवा नसो जनतेचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे, चुकीच्या कामांना पाठिंबा दिला नाही पाहिजे, असंही श्रीरंग बारणे यांनी पुढे म्हटलं आहे.
“पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस स्टेशनवर अनेक गैर प्रकार घडत असुन सर्व सामान्य नागरीक तक्रार घेवून आल्यास त्यांची तक्रार तात्काळ दाखल केली जात नाही. अनेक वेळ त्याला पोलीस स्टेशनवर बसवून ठेवले जाते, मानसिक त्रास दिला जातो. पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी, वाकड, काळेवाडी, सांगवी या पोलीस स्टेशनच्या अनेक तक्रारी माझ्याकडे सर्व सामांन्य नागरीकांनी दिल्या आहेत. पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी सर्रास पणे हप्ते वसुली करत असून वरिष्ठांना हप्ता द्यावा लागतो असे सांगत आहेत.”
“लोकप्रतिनिधी म्हणुन एकाद्या नागरीकांविषयी फोन केला असता, उलट त्याला नाहक त्रास दिला जातो. एकंदर पिंपरी चिंचवड शहरात अनेक वाढत्या गुन्हेगारीला पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचे जाणवते. या बाबत संबंधित पोलीस स्टेशनची माहिती घेवून कारवाई करावी अन्यथा या संबंधित मला अंदोलन करावे लागेल”, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
हेही वाचा :
एक हिट चित्रपट देऊन ‘हा’ मुलगा रातोरात झाला स्टार
आज सोन्याचे दर वाढले, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा 24 कॅरेटचे दर
विनोद कांबळीसाठी एकनाथ शिंदेंनी पुढे केला मदतीचा हात