शिर्डी : साई समाधी मंदिरातील(temple) साईंच्या संगमरवरी मूर्तीची भविष्यात हुबेहूब प्रतिकृती तयार करता यावी, तसेच तब्बल 70 वर्षांपूर्वी इटालियन मार्बलमध्ये घडवण्यात आलेल्या या मूर्तीची सद्यस्थिती काय आहे, याचा अंदाज यावा, यासाठी साई मूर्तीचं 3D स्कॅनिंग केलं जाणार आहे.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेली तज्ज्ञांची समिती हे काम करणार आहे. ही समिती 20 डिसेंबरला साई मंदिरास(temple) भेट देऊन हे थ्रीडी स्कॅनिंग करणार आहे. त्यामुळे 20 डिसेंबरला दुपारी पावणेदोन ते साडेचार या कालावधीत साई मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
थ्रीडी स्कॅनिंग म्हणजे काय?
- साईमूर्तीची 360 अंशांच्या कोनातून चोहोबाजूंनी फोटोग्राफी केली जाणार आहे. या फोटोग्राफीचे नंतर डिजिटल स्वरूपात मॉडेल तयार केले जाणार आहे.
- थ्रीडी स्कॅनिंग म्हणजे डिजिटल वातावरणात मूर्तीच्या भूमितीची अचूकता टिपणे.
- थ्रीडी स्कॅनिंग हे वस्तू किंवा वातावरणाचं विश्लेषण करून वस्तूच्या आकाराचा, शक्यतो त्याच्या स्वरूपाचा (उदा. रंग) त्रिमितीय डेटा गोळा करण्याची प्रक्रिया आहे.
- संकलित डेटा नंतर डिजिटल थ्रीडी मॉडेल तयार करण्यासाठी वापरला जातो.
साईदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता साईबाबांच्या समाधी मंदिरात फुल, हार आणि प्रसाद नेण्यास परवानगी मिळाली असून भाजपचे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील आणि संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर, कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या हस्ते संस्थान कर्मचारी सोसायटीच्या स्टॉलचं आज उदघाटन करण्यात आलं. कोविड काळात साई मंदिरात फुल, हार आणि प्रसाद नेण्यावर बंदी घालण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही बंदी हटवण्यात आली आहे.
भाविकांची फसवणूक होऊ नये, यासाठी नियमावली आणि दर निश्चित करून फुल, हार आणि प्रसादाची विक्री केली जाणार असल्याचं सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय. सुरूवातीला साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी मार्फत हार, फुल तसेच प्रसाद विक्रीस परवानगी देण्यात आली असून मंदिराच्या बाह्य परिसरातील प्रसाद विक्रेत्यांसाठी नियमावली तयार करून फुल, हार आणि प्रसादास परवानगी देण्याचा विचारधीन असल्याचं सुजय विखेंनी सांगितल. या निर्णयामुळे ग्रामस्थ, फुल-प्रसाद विक्रेते तसेच भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येतंय.
हेही वाचा :
शक्तिमान फेम मुकेश खन्नांवर संतापली सोनाक्षी
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील अडीच वर्षांनी बदलणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल
भारतीयांसाठी धक्कादायक बातमी! बुमराह निवृत्त होतोय? अख्तर म्हणाला, ‘मी त्याच्या जागी…’