विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील(political consultant) नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना(political consultant) या नावाला कलंक लावत आहेत. कारण एक असा काळ होता की, जेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मुंबईत मातोश्रीवर येऊन चर्चा करत होते. मात्र आता सध्याचे चित्र हे उलट असून ते मोठे गंमतीशीर आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये आहेत. मात्र आता त्यांचं काय होणार आणि कधी होणार याची त्यांना देखील माहितीनाही अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
याशिवाय संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपासह वरळी विधानसभा आणि शिवडी विधानसभेतील तिढा याबद्दल देखील मोठे भाष्य केले आहे. स्वतःला शिवसेना म्हणवून घेणारे मात्र आता विधानसभेच्या तोंडावर दिल्लीत जाऊन उठाबशा काढत आहेत असे ते म्हणाले आहेत.
संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेने उठाबशा काढायचे काम कधीही केलेले नाही. कारण जागावाटपासाठी किंवा कोणताही निर्णय घेण्यासाठी आम्ही कधी सुद्धा दिल्लीत गेलो नाही. मात्र आता शिवसेना चोरणारे आणि स्वतःला शिवसेना डुप्लिकेट प्रमुख म्हणवणारे सध्या मुख्यमंत्री गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत.
तसेच ते आता केंद्रीत गृहमंत्री अमित शहा यांच्या दरवाजात जाऊन बसले आहेत. मात्र हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. याशिवाय असे करून ते शिवसेना या नावाला देखील कलंक लावत आहेत असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा :
दिवाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
विधानसभा निवडणुकीच असं हे “करवीर” महात्म्य
अजितदादांची जबरदस्त खेळी, मविआतील ‘या’ बड्या नेत्यांविरोधात टाकला मोठा डाव