11 दिवसांनंतरही शिवसेना पदाधिकारी गायब; धक्कादायक माहिती समोर

शिंदे गटाचे पदाधिकारी आणि डहाणू विधानसभा(political issue) मतदारसंघाचे समन्वयक अशोक धोडी हे मागील अकरा दिवसांपासून बेपत्ता आहेत. एक राजकीय पदाधिकारी बेपत्ता होऊन इतके दिवस उलटले, तरी पोलिसांना अद्याप धोडी यांचा शोध घेण्यात यश आलेले नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे धोडी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही पोलिसांना धोडी यांच्याबद्दल फारशी माहिती मिळालेली नाही.

अपहरणाच्या घटनेला 11 दिवस उलटून गेल्याने आणि धोडी यांचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने धोडी यांच्यासोबत घातपात(political issue) घडला असावा, असा संशय आता पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. 20 जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास धोडी यांचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर त्यांची गाडी गुजरातच्या दिशेने गेल्याचे एका सीसीटीव्हीत दिसून आले होते. पण त्यानंतर पोलिसांना धोडी यांच्या गाडीचा माग घेता आलेला नाहीये.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी 20 जानेवारीला अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता. आपण डहाणूहून घरी येत असल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले होते. मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. आता अकरा दिवसानंतरही त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नाहीये. पाच आरोपींनी धोडी यांचे अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आहे. हे पाचही आरोपी फरार असून यातील दोन आरोपी हे राजस्थानला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे.

शिवाय पोलीस चौकीतून पळून गेलेला आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. अशोक धोडी हे परराज्यातून होणाऱ्या दारू तस्करी प्रकरणात अडचण ठरत होते. याच कारणातून त्यांचे अपहरण करून त्यांच्यासोबत घातपात केल्याचा संशय पोलिसांना आहे. दारू तस्करीतून संशयित आरोपींनी कोट्यवधींची माया जमवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

अशोक धोडी बेपत्ता प्रकरणात पोलीस तपासाला अद्याप म्हणावे तसे यश मिळालेले नाही. या प्रकरणात घातपाताची शक्यता बळावली असून, पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून सत्य समोर आणावे, अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा :

भाजप-ठाकरे यांच्या युतीच्या ‘सुवर्णक्षणांची’ मुहूर्तमेढ पुन्हा रोवली जाणार? : संजय राऊत

…जर कोणी खंडणी मागितली तर ; बीडच्या पहिल्याच दौऱ्यात अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना दम

अखेर DeepSeek वर बंदी, यूएस नेव्हीचा मोठा निर्णय! AI मॉडेलबाबत जारी केले हे कठोर नियम

धक्कादायक ! २३ वर्षीय रशियन तरुणीसोबत भररस्त्यात भयंकर प्रकार…