महायुती (Political)सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. दुपारच्या सुमारास नागपुरातील राजभवनात शपथविधी सोहळा होईल. 1991 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात झाला होता. 1991 ला ज्यावेळी शिवसेना फुटली, त्यानंतर छगन भुजबळ गटाने बंड करत काँग्रेस सोबत शपथ घेतली. 33 वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम हा नागपुरात होणार आहे. 1991 च्या नागपुरात झालेल्या शपथविधी सोहळ्यात नेमकं काय घडलं होते, जाणून घ्या…
21 डिसेंबर 1991 मध्ये उपराजधानी नागपुरात (Political)मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला होता. तेव्हा एकटे छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.. तर वसुधा देशमुख, राजेंद्र गोडे, भरत बाहेकार, शंकर नम, जयदत्त क्षीरसागर आणि शालिनी बोरसे या सहा उपमंत्र्यांनी (राज्य मंत्री नाही) शपथ घेतली होती.
या शपथविधी सोहळ्याच्या दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना छगन भुजबळ त्यांच्या 11 सहकारी आमदारांसह शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले होते. तेव्हा भुजबळ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल अशी चर्चा होती.. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी सुधाकरराव नाईक 19 डिसेंबरच्या रात्री उशिरा नागपुरातून हिवाळी अधिवेशन सोडून दिल्लीला गेले होते. 20 डिसेंबरच्या सकाळी दिल्लीतून ते थेट मुंबईला परतले होते. 20 डिसेंबरच्या दुपारी सुधाकरराव नाईक यांनी तत्कालीन राज्यपाल श्री सुब्रमण्यम यांना नव्या मंत्र्यांची यादी मुंबईत सोपवली होती.
एक कॅबिनेट मंत्री आणि सहा उपमंत्री यांना दिली गेली होती शपथ-
20 डिसेंबरच्या रात्री उशिरा सुधाकरराव नाईक यांनी नागपुरात येऊन आपण छगन भुजबळ आणि काही उपमंत्र्यांना मंत्रिमंडळात घेत आहोत असे पत्रकारांसमोर जाहीर केले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 21 डिसेंबरला तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्यम हे तातडीने मुंबईवरून नागपूरला आले होते. दिवसभर अधिवेशनाचा कामकाज चालल्यानंतर संध्याकाळी अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर साडेचार वाजता नागपूरातील राजभवनात एक कॅबिनेट मंत्री आणि सहा उपमंत्री यांना शपथ दिली गेली होती. त्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे तेव्हाचे सुधाकरराव नाईक यांच्या सरकारचे मंत्रिमंडळ त्रिस्तरीय ( कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री) झाले होते.
मात्र महाराष्ट्राच्या निर्मिती पूर्वी म्हणजेच 1952 मध्ये वसंतराव नाईक यांचा नागपूर येथे तत्कालीन मध्य प्रांत च्या सरकारमध्ये उपमंत्री म्हणून छोटा शपथविधी सोहळा पार पडला होता. (म्हणजेच नागपुरातला हा तिसरा मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा आहे.. तर 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतरचा दुसरा शपथविधी सोहळा आहे..)
हेही वाचा :
प्लास्टिक किंवा कागदाच्या कपात चहा पिताय?
महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? सर्वात महत्त्वाची माहिती समोर
स्पेशल डिश झटक्यात वजन करेल कमी; जान्हवी कपूर करते आहारात समावेश