कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : रुग्णालय, पोलीस(police), बाल न्याय मंडळ, उत्पादन शुल्क विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय या सर्व प्रस्थापित व्यवस्थांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणाऱ्या कल्याणी नगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात शिवानी अग्रवाल अटक करण्यात आली आहे. या दहाव्या संशयित महिला आरोपीला अटक केल्यानंतर या गुन्ह्यातील एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. एका धन दांडग्या कुटुंबातील अल्पवयीन संशयित गुन्हेगाराला वाचवण्यासाठी काहीजणांनी आपले” ईमान”विकले विकले आणि हे इतक्या झटपट घडले की सामान्य माणूस चकित झाला.
कायद्यासमोर सगळे समान आहेत असे म्हटले जाते. पण ज्याने कोणी कायदा हातात घेऊन गुन्हा(police) केला आहे त्याचा आर्थिक स्तर पाहून संबंधित यंत्रणा कार्यरत होतात. सामान्य व्यक्तीशी वेगळा आणि श्रीमंत व्यक्तीशी वेगळा व्यवहार इथे केल्याचे अनेकदा पाहायला मिळते. साधारण स्थितीतील एखाद्या तरुणाने किंवा अल्पवयीन मुलाने गुन्हा केला की त्याला पोलीस त्याच्या मुस्क्या आवळून पोलीस ठाण्यात नेतात मात्र श्रीमंत कुटुंबातील एखाद्या तरुणाने किंवा अल्पवयीन मुलाने गुन्हा केला असेल तर त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट पोलीस ठाण्यात दिली जाते.
कल्याणी नगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन गुन्ह्यातील अल्पवयीन संशयित गुन्हेगाराला तो गर्भ श्रीमंत घराण्यातील आहे म्हणून त्याला पोलीस ठाण्यातील कर्मचारी पिझ्झा बर्गर वगैरे खायला आणून देतात. त्यामुळे कायदा सर्वांच्या साठी समान आहे हे फक्त वाचायला बरे वाटते.
अग्रवाल कुटुंबातील चार, पब मालकासह तिघेजण, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एक कर्मचारी, असे एकूण दहाजण याप्रकरणी गजाआड झाले आहेत. आणि त्यांच्याविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. अल्पवयीन संशयित आरोपीच्या विरुद्ध सदोष मनुष्य वध, मोटर वाहन कायदा असे गुन्हे दाखल आहेत. विशाल अग्रवाल याच्या विरुद्ध शासन यंत्रणेवर दबाव आणणे, त्यांना पैसे देणे या आरोपावरून गुन्हे दाखल आहेत तर सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्याविरुद्ध ड्रायव्हरला घरात कोंडून ठेवणे, त्याचे अपहरण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत तर शिवानी अग्रवाल यांच्या विरुद्ध पुरावा नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याशिवाय ससून रुग्णालयाचे दोन वैद्यकीय अधिकारी आणि एक कर्मचारी या तिघा जणांच्या विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवानी अग्रवाल यांनी ससून रुग्णालयातील सी.सी. टीव्ही कॅमेरे नसलेल्या एका खोलीत आपल्या रक्ताचे नमुने संशयीत आरोपी असलेल्या डॉक्टरला दिले असा त्यांच्यावर आरोप असून त्यांची डी एन ए टेस्ट घेतली जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची टेस्ट घेण्यासाठी संशयीत आरोपीची संमती आवश्यक असते. शिवानी अग्रवाल ह्या डीएनए टेस्ट साठी तयार होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
या हिट अँड रन प्रकरणी महाराष्ट्रात सध्या राजकारण सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार धंगेकर, अंजली दमानिया यांनी या प्रकरणात एक आमदार आणि एक मंत्री यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील बनले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचीही गय करू नका असा आदेश पोलीस प्रशासनाला दिला आहे तर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अशाच प्रकारचा आदेश पोलीस प्रशासनाला देताना प्रसंगी माझ्याविरुद्ध या प्रकरणात पुरावे असतील तर मला सुद्धा सोडू नका असे म्हटले आहे. महाराष्ट्राचे सेवानिवृत्त मुख्य सचिव अरुण भाटिया यांनी तर पुण्याच्या पोलीस आयुक्तांच्या वरच कारवाई करा अशी मागणी करून खळबळ उडवून दिली आहे.
बहुतांशी रस्ते कार अपघातात, चालकाकडून वाहनाचे ब्रेक निकामी झाले होते, अचानक इंजिन बंद पडले, चालते वाहन अचानक बिघडल्यामुळे अपघात झाला. अशा प्रकारचा युक्तिवाद किंवा बचाव केला जातो. कल्याणी नगर परिसरात पोर्शे कारचा अपघात होऊन दोघांचा बळी गेला होता. पोर्शै कार ही जर्मन मेड असून तेथील मेकॅनिकल कारची तपासणी करण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांनी कारचे तपासणी करून कार मध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झालेला नव्हता. असा अहवाल दिला असल्यामुळे पोलिसांच्या हाती तो एक मोठा पुरावा लागला आहे.
हेही वाचा :
काँग्रेसला अच्छे दिन! तब्बल दहा वर्षांनी काँग्रेस तीन आकड्यांवर
‘मोदी ‘भूतपूर्व’ झाल्यावर सरळ मार्गाने सत्ता सोडतील काय?’ ठाकरे गटाला वेगळीच शंका
ब्रेकिंग! देशातील पहिला निकाल लागला; मतमोजणी आधीच भाजपने खातं खोललं