राज्यात आता कोणत्याही दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेसाठी(politics) निवडणुकांची घोषणा होऊ शकते त्यामुळे पक्ष आणि चिन्हाबाबात तातडीने सुनावणी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
या मागणीचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने (politics)या प्रकरणात सुनावणीसाठी 1 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. तसेच या प्रकरणात 1 ऑक्टोबरलाच निर्णय येण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नवं चिन्ह द्या आणि या याचिकेवर जेव्हापर्यंत निकाल लागत नाही तेव्हापर्यंत घड्याळ चिन्ह वापरण्यास बंदी घाला, अशी मागणी शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. तसेच अजित पवार गटाला नवीन निवडणूक चिन्ह देण्यात यावे अशी मागणी देखील शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला पिपाणी या चिन्हामुळे मोठा फटका बसला आणि एक खासदार जिंकता जिंकता हरला असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता तसेच याबाबत शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली होती.
तर दुसरीकडे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला होता त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात 1 ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:
करवीरमध्ये शेकापचा काँग्रेसला पाठिंबा; दोन सडोलीकर एकत्रित राजकीय रणनीती
दोन भावांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू; परिसरात खळबळ
“राज ठाकरे यांची लाडकी बहीण योजनेवर टीका; ‘जानेवारीत पगार द्यायला देखील…’ असं म्हणाले”