अजित पवारांना धक्का, तब्बल ‘इतक्या’ नेत्यांनी हाती घेतली तुतारी

ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान(current political news) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसलाय. सोलापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी झाली आहे. काही नेत्यांनी येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांनी तुतारी हाती घेतली आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत गोविंद बाग येथे भूमकरांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी(current political news) राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. भूमकर हे वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. त्यांची नगरपंचायतीवर एकहाती सत्ता आहे.

अशात त्यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केलाय. गोविंद बाग येथे निरंजन भूमकरांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.निरंजन भूमकर यांच्या सोडचिठ्ठीमुळे अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये तिकीट न मिळाल्यावरून नेत्यांच्या इनकमिंग आणि आउटगोइंग सुरू असल्याचं चित्र दिसून येतंय.

महायुतीमध्ये बंडखोर नेत्यांची सर्वाधिक संख्या दिसून येतेय. काही नेते तर महायुतीत असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीने भाजपचे आमदार महेश लांडगेंना पुन्हा एकदा संधी दिल्याने विलास लांडे हे नाराज झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार विलास लांडे यांनी थेट शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलाय.

तर, काही भाजप नेत्यांनी शिंदे गटात आणि राष्ट्रवादीत प्रवेश करत आपलं तिकीट कन्फर्म करण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे. भाजपचे तब्बल 12 नेते शिंदे यांच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये निलश राणे यांचा देखील समावेश आहे. तर, 5 भाजप नेत्यांनी ऐन निवडणुकीत अजित पवार गटात प्रवेश करत तिकीट मिळवलं आहे.

हेही वाचा :

इस्रायलने गाझा पट्टीत केलेला भीषण हल्ला: १४९ जणांचा मृत्यू

दिवाळीत माणुसकीला काळीमा: तरुणीला दारु पाजून पाच जणांकडून गँगरेप

‘सलमानपेक्षा लॉरेन्स परवडाला’ म्हणत अभिनेत्रीचं खळबळजनक विधान