महाराष्ट्राच्या राजकारणात(Political issue) सध्या मोठ्या उलथापालथी घडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीमधील पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. विशेषतः शिवसेना शिंदे गटाचे “ऑपरेशन टायगर” वेगाने सुरू असून, त्याचा प्रभाव राज्यभरात जाणवत आहे.

या पार्श्वभूमीवर, साताऱ्यात काँग्रेसला(Political issue) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस असलेले अॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर हे माजी मंत्री स्वर्गीय विलास काका उंडाळकर यांचे पुत्र असून, त्यांच्या या राजकीय निर्णयाने साताऱ्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अॅड. उदयसिंह पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवेशाच्या चर्चेमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, विशेषतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी ही स्थिती आव्हानात्मक ठरू शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार, उदयसिंह पाटील यांनी त्यांच्या निवडक प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असता, अनेक कार्यकर्त्यांनी लवकरच पक्षप्रवेश करण्याची शिफारस केली. तसेच, त्यांच्या प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अॅड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अधिक बळकट होणार असून, आगामी राजकीय घडामोडींवर त्याचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
भाजपला मदत करणाऱ्या नेत्यांना पक्षाबाहेर हाकलणार; राहुल गांधी चिडले
मेहनत न घेता बायकोला कसं खुश करायचं? नव-यांनो वापरा हा खास उपाय
विद्यार्थ्यांसमोर महिला शिक्षकांनी एकमेकांना लाठ्यांनी हाणले; मारामारीचा Video Viral