दिवाळी(Gold) सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीत लोक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत असतात. मात्र, या दिवाळीत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार असल्याचं चित्र दिसून येतंय. गेल्या काही दिवसापासून मौल्यवान धातू सोन्याचे दर रॉकेटच्या तेजीत आहेत. ऑगस्ट महिन्यापासून सोन्याचे दर सतत वाढताना दिसत आहेत. सप्टेंबर महिन्यात देखील दरवाढीचे अनेक विक्रम मोडले गेले. आता ऑक्टोबर महिना संपत आला मात्र, सोनं जराही स्वस्त झालं नाही.
सोन्याचे(Gold) दर जीएसटीसह प्रति तोळा 81 हजार 885 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 3 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या सहा दिवसात सोन्याचे भाव तब्बल दीड हजार रुपयांनी महागले. या आठवड्यात आतापर्यंत सोन्यात 650 रुपयांची वाढ झाली. आज 24 ऑक्टोबररोजी देखील भाव तेजीत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,220 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे
तर, चांदीने देखील दमदार आघाडी घेतली आहे. गेल्या आठवड्यात चांदी तीन हजार रुपयांनी महागली. या आठवड्यात देखील चांदीमध्ये 4,500 रुपयांची वाढ नोंदवली गेली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,04,000 रुपये झाला आहे. चांदीने आता लाखाचा देखील टप्पा गाठला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता सोनं खरेदी करावं की नाही, असा प्रश्न पडलाय.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोनं 78,692, 23 कॅरेट 78,377, 22 कॅरेट सोनं 72,082 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 18 कॅरेट आता 59,019 रुपये, 14 कॅरेट सोनं 46,035 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते.
हेही वाचा:
बांधकाम व्यावसायिकाची भर रस्त्यात हत्या
कुटुंब रंगलय राजकारणात!
एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही, मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य