धनंजय मुंडेंना धक्का; मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय

माझगाव सत्र न्यायालयाने एक महत्त्वाचा (decision)निर्णय देत करुणा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे केवळ लिव्ह-इन नव्हे, तर लग्नासारख्या स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांना दोन लाख रुपये मासिक पोटगी देण्याचा निर्णय दिला होता, ज्याविरोधात धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका 5 एप्रिल रोजी फेटाळून लावण्यात आली.

या निकालाच्या सविस्तर प्रतीनुसार, करुणा आणि धनंजय मुंडे यांना दोन मुले असून, ती एकत्र वास्तव्यास असल्याशिवाय शक्य नसल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. त्यामुळे दोघांमधील नातं वैवाहिक स्वरूपाचं असल्याचा ठाम निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला आहे. याचाच अर्थ करुणा मुंडे (decision)यांना ‘डोमेस्टिक व्हायोलन्स अ‍ॅक्ट’अंतर्गत संरक्षण आणि मदतीचा हक्क आहे.

करुणा मुंडे यांना हक्काची साथ
न्यायालयाने दिलेल्या आदेशात अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी स्पष्ट म्हटलं आहे की, करुणा मुंडे यांना अंतरिम देखभालीचा आदेश योग्य आहे. धनंजय मुंडे हे एक प्रतिष्ठित राजकारणी असल्याने त्यांच्यासारखी जीवनशैली करुणा मुंडे व त्यांच्या मुलांना देखील मिळावी, असेही न्यायालयाने नमूद केले.

सुनावणीदरम्यान करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं (decision)इच्छापत्र सादर केलं, ज्यात त्यांना ‘पहिली पत्नी’ म्हणून उल्लेख करण्यात आला होता. तसेच त्यात चार मुलांची नावे नोंदलेली होती. करुणा मुंडे यांनी हे इच्छापत्र खरे असल्याचा दावा केला. मात्र मुंडे यांच्या वकिलांनी हे दस्तावेज खोटे असल्याचं सांगितलं आणि 2017 मध्ये तयार करण्यात आल्याचा दावा केला. या सर्व मुद्द्यांचा विचार करून सत्र न्यायालयाने मुंडे यांची याचिका फेटाळली आणि पूर्वी दिलेल्या पोटगीच्या निर्णयाला दुजोरा दिला.

हेही वाचा :

‘या’ अभिनेत्रीने नाकारली ६०० कोटींची संपत्ती; लग्नापूर्वी झाली ३४ मुलांची आई

इचलकरंजीत नवकार महामंत्र महाजपास हजारोंचा प्रतिसाद

बाप की हैवान? पोटच्या १६ वर्षीय मुलीवर वर्षभरापासून अत्याचार; गरोदर झाल्यावर…