शिंदे गटाच्या नेत्याला धक्का! अपक्ष उमेदवाराकडून कोर्टात धाव

रायगड: रायगडमधील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर सुधाकर घारे यांनी मुंबई हायकोर्टात(court) धाव घेत थोरवे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. थोरवे यांच्या निवडणुकीतील विजयावर आक्षेप घेत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये निसटता विजय मिळवले असल्याचा दावा घारे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे.

कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आमदार थोरवे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच ही याचिका मुंबई हायकोर्टाने(court) स्वीकारली आहे. अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी थोरवे यांच्या निवडणुकीतील विजयावर आक्षेप घेत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवडणूक विजयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेतल्यानं, थोरवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या याचिकेत घारे यांनी महेंद्र थोरवे विरोधात विविध आरोप लावले. तसेच भ्रष्ट पद्धतीने निवडणुकीमध्ये निसटता विजय मिळविला असल्याचा आरोप घारे यांनी केला आहे.

खोटा अपप्रचार, भ्रष्टाचार, डमी उमेदवार उभे करून चुकीच्या आणि भ्रष्ट पद्धतीने निवडणुकीमध्ये निसटता विजय मिळवला असल्याचं घारे यांचं म्हणणं आहे. याबाबतचे सर्व पुरावे जमा करून अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी हायकोर्टामध्ये थोरवे यांच्या निवडणूक विजयाला आव्हान दिलं आहे. तसेच ही याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारली आहे. त्यामुळे थोरवे यांच्या अडचणीत आणखीन वाढ होणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा :

जिममध्ये ट्रेनरला वर्कआऊट विचारणं पडलं महागात; धक्कादायक प्रकार समोर

घराबाहेर बसायचं की नाही? गाडीवरुन आले अन् तरुणीच्या हातातून फोन हिसकावला Video

ट्रम्प यांची भारत आणि चीनला थेट धमकी; म्हणाले, ‘असं केलं तर मी 100% कर लावेन’